सोनियांचं भाजपविरोधी १८ राजकीय पक्षांना मेजवानीचं आमंत्रण

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधीपक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानीचं आयोजन केलंय.

Updated: Mar 13, 2018, 01:22 PM IST
सोनियांचं भाजपविरोधी १८ राजकीय पक्षांना मेजवानीचं आमंत्रण  title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधीपक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानीचं आयोजन केलंय.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आघाडी बांधण्याच्या प्रयत्न काँग्रेसनं सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणून या मेजवानीचं आयोजन करण्यात आलंय. 

मेजवानीला भाजप विरोधाच्या १८ राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, द्रमुक यापक्षांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशची सत्तारुढ तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), बीजू जनता दल (बीजद) आणि टीआरएसच्या नेत्यांना या मेजवानीसाठी आमंत्रण देण्यात आलेलं नाही.

तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र या कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवणंच पसंत केलंय. परंतु, त्यांच्या पक्षातून सुदीप बंडोपाध्याय आणि डेरेर ओ-बरायन या मेजवानीत उपस्थित राहणार आहेत.  

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातही विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी केला होता. आज रात्री होणारी मेजवानी त्याचाच पुढचा भाग आहे.