Good News : बाजारात येणार 'हा' नवा IPO... पाहा तुमच्या खिशाला कसा होईल फायदा

कंपनी या आयपिओतर्फे 635 कोटींची उभारणी करणार आहे. जर तुम्ही या नव्या आयपिओत गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर अजिबात वेळ दवडू नका हा नवा आयपिओ तुमच्या खिशाला चांगले रिटर्न्स(Returns) देऊ शकते. 

Updated: Nov 10, 2022, 09:29 AM IST
Good News : बाजारात येणार 'हा' नवा IPO... पाहा तुमच्या खिशाला कसा होईल फायदा  title=

Upcoming IPO: आता एक नवा आयपिओ (IPO) तुमच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केटमध्ये एक खुशखबर आहे. जे गुंतवणूकदार पब्लिक इश्यूची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सध्या गुंतवणूकदारही (Investors) नव्या गुंतवणूकीच्या संधींची वाट पाहत आहेत. आपल्याला माहितीच आहे रूस्तमजी यांचा ब्रॅंड हा जगप्रसिद्ध आहे. या ब्रॅंड अंतर्गत 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही या आयपिओचे सदस्यत्व घेऊ शकता. या कंपनीनं त्यांच्या आयपिओसाठी 9 नोव्हेंबर रोजी 514-541 रूपये प्रति शेअरचा प्राईझ ब्रँड निश्चित केला आहे. कंपनी या आयपिओतर्फे 635 कोटींची उभारणी करणार आहे. जर तुम्ही या नव्या आयपिओत गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर अजिबात वेळ दवडू नका हा नवा आयपिओ तुमच्या खिशाला चांगले रिटर्न्स(Returns) देऊ शकते. (upcoming ipo Price band of this issue has been decided check details for investment) 

कधीपासून लावू शकता बोली? 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) च्या माहितीनूसार, कीस्टोन रिअलटर्सचा (Keystone Realtors) पब्लिक इश्यू (Public Issue) 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल तर IPO मध्ये बोली लावण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर आहे. IPO फक्त 11 नोव्हेंबर रोजी पहिल्या गुंतवणूकदारीसाठी उघडेल. मुंबईस्थित कंपनी पब्लिक इश्यूमधून 635 कोटी रुपये उभारणार आहे, जे पूर्वी 850 कोटी रुपये होते. IPO मध्ये 550 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचे (Equity Shares) ताजे शेअर्स जारी केले जातील, अशी माहिती मिळते आहे. कीस्टोन रिअल्टर्स आयपीओमधून 341.6 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरतील. काही निधी हा भविष्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांच्या संपादनासाठी वापरला जाईल. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

नवीन इक्विटी शेअर्स आणि OFS (Equity Shares)

ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये प्रवर्तक 75 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. यामध्ये प्रवर्तक बोमन रुस्तम इराणी 37.5 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. तसेच पर्सी सोराबजी चौधरी आणि चंद्रेश दिनेश मेहता 18.75 -18.75 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. कीस्टोन रिअलटर्स आयपीओद्वारे उभारलेल्या पैशांपैकी 341.6 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरतील. अर्धा IPO पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIIs) राखीव असेल. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के आणि गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के राखीव असतील. गुंतवणूकदार इश्यूमध्ये किमान 27 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतील. 

कंपनीचा व्यवसाय काय आहे? (What is the functioning of the company)

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....
कंपनीची स्थापना 1995 मध्ये झाली. या कंपनीचे आतापर्यंत 32 प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर 12 प्रकल्प मार्गी लागले आहेत. लवकरच MMR मध्ये 19 प्रकल्प सुरू होणार आहेत. रुस्तमजी ब्रँड(Rustomji Brand) अंतर्गत सुरू होणार्‍या परवडणाऱ्या, मध्यम, प्रीमियम, सुपर प्रीमियम श्रेणींचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. NSE आणि BSE वर शेअर्सची लिस्ट 24 नोव्हेंबरला होईल.