UPSC EPFO Recruitment: भविष्य निर्वाह निधी संघटनेत सरकारी नोकरीची संधी! 577 जागांसाठी जाहिरात प्रकाशित

UPSC EPFO Recruitment 2023: कर्मचारी निधी संघटनेमधील (ईपीएफओ) एकूण 577 पदांसाठी राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने नोकरभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे.

Updated: Feb 22, 2023, 11:32 AM IST
UPSC EPFO Recruitment: भविष्य निर्वाह निधी संघटनेत सरकारी नोकरीची संधी! 577 जागांसाठी जाहिरात प्रकाशित title=
UPSC EPFO Recruitment

UPSC EPFO Recruitment 2023: ईपीएफओमध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) 418 इन्फोर्समेंट ऑफिसर (ईओ) आणि अकाउंट्स ऑफिसर (एओ) तर 159 असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिश्नरच्या (एपीएफसी) पदांबरोबरच एकूण 577 पदांसाठी नोकरभरती (EPFO Recruitment 2023) होणार आहे. यासंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आयोगाद्वारे 'रोजगार समाचार'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ईओ/एसओच्या जाहिरातीमधील 418 जागांपैकी 204 जागा अनारक्षित आहेत. तर 57 एससी, 28 एसटी, 78 ओबीसी आणि 51 दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. अशाचप्रकारे एपीएफसीच्या 159 पदांपैकी 68 अनारक्षित, 25 एससी, 12 एसटी, 38 ओबीसी आणि 16 दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

UPSC EPFO Recruitment 2023: अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 25 फेब्रुवारीपासून सुरु होणार

यूपीएससीद्वारे ईपीएफओसाठी जारी करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये इच्छूकांना आयोगाच्या अॅप्लिकेशन पोर्टलवर म्हणजेच upsconline.nic.in या वेबसाईटवरुन अर्ज करता येईल, असं म्हटलं आहे. अर्जदारांना सुरुवातीला 'वन टाइम रजिस्ट्रेशन' करावं लागणार आहे. यानंतर जारी करण्यात आलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगइन करुन अर्जदार आपला अर्ज दाखल करु शकतात. अर्ज केल्यानंतर या अर्जाचं प्रिंट आऊट काढावे. तसेच सॉफ्ट कॉपीही उमेदवारांनी सेव्ह करुन ठेवावी. यूपीएससीने जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2023 रोजी सुरु होणार असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 ही आहे.

वयोमर्यादा किती?

राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने ईपीएफओमध्ये एओ/ईओ आणि एपीएफसी पदांच्या भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या पूर्वसूचनांमध्ये शैक्षणिक योग्यता किती असावी यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही. यासाठी उमेदवारांना आयोगाकडून 25 फेब्रुवारीपासून जारी केल्या जाणाऱ्या नोटीफिकेशनची वाट पहावी लागणार आहे. 25 फेब्रुवारीला सविस्तर अधिसूचना जारी केली जाणार आहे. सध्या दिलेल्या जाहिरातींमध्ये कमाल वयोमर्यादा किती असावी याचा उल्लेक करण्यात आला आहे. एओ/ईओ पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 30 वर्ष इतकी आहे. तर एपीएफसी पदांसाठीची वयोमर्यादा 35 वर्ष इतकी आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.