UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगात नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा भरती अंतर्गत ऍनेस्थेसियोलॉजी, बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी आणि इतर विभागांमध्ये केली जाणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jan 3, 2024, 07:11 PM IST
UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगात नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज title=

UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यामाध्यमातून तरुणांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत स्पेशलिस्टच्या एकूण 78 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्पेशलिस्ट ग्रेड 3 पदांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

केंद्रीय लोकसेवा भरती अंतर्गत ऍनेस्थेसियोलॉजी, बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी आणि इतर विभागांमध्ये केली जाणार आहे.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच संबंधित विषयात पीजी पदवी असावी. केंद्र सरकारच्या या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 30 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षे असावे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सवलत, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना दहा वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. 

अर्ज शुल्क 
केंद्रीय लोकसेवा भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून फक्त 25 रुपये भरावे लागतील. तर महिला प्रवर्ग, एससी, एसटी आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांकडून अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही. 

यासाठी उमेदवारांकडून 11 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अद्याप मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही.