नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे सोमवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी सोमवारी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
आनंद सिंह बिष्ट यांना लिवर आणि किडनीची समस्या होती. त्यांची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्याचे निधन झाले.
मंगळवारी हरिद्वारमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश के. अवस्थी यांनी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे आज सकाळी 10.44 वाजता निधन झाले असल्याचे सांगत दु:ख व्यक्त केले आहे.
CM Yogi Adityanath's father left for his heavenly abode at 10.44 am. Our deepest condolences: State Additional Chief Secretary (Home) Awanish K Awasthi (in file pic - Additional Chief Secretary Home) pic.twitter.com/vG6hUqDBch
— ANI UP (@ANINewsUP) April 20, 2020
राज्याचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनीदेखील योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
मा0 मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी के पिता श्री आनंद सिंह बिष्ट जी के निधन की दुःखद सूचना प्राप्त हुई है।
ईश्वर दिवंगत आत्मा को शांति और परिवार तथा शुभचिंतकों को संबल प्रदान करें । ॐ शांति ॐ— Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) April 20, 2020