उत्तर प्रदेश : चुलतीवर जीव जडला अन् त्याने काकाला संपवलं! वाद, शिव्यांना कटाळून तरुणाने...

Uttar Pradesh Crime News: या तरुणाने थेट आपल्या चुलतीला आपला जीव तुमच्यावर जडला आहे असं सांगितलं. यासंदर्भातील माहिती या महिलेने तिच्या पतीला दिली आणि दोघांमध्ये वाद झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 27, 2023, 09:46 AM IST
उत्तर प्रदेश : चुलतीवर जीव जडला अन् त्याने काकाला संपवलं! वाद, शिव्यांना कटाळून तरुणाने... title=
चुलत्याची हत्या केल्यानंतर आरोपी फरार

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील पीलभीतमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नात्यांना काळीमा फासणाऱ्या या घटनेमध्ये आकाश नावाच्या व्यक्तीने आपल्याच चुलत्याची हत्या केली आहे. आपल्या चुलतीवर प्रेम जडल्याने या व्यक्तीने चुलत्याला संपवल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीने आपल्या मनातील भावना चुलतीला सांगितल्या. चुलतीने हा सारा प्रकार आपल्या पतीला कळवला. त्यानंतर काका पुतण्यामध्ये वाद झाला. याच वादाचा राग मनात धरुन या तरुणाने आपल्या चुलत्याला बेदम मारहाण करु लागला. तो चुलत्याचा स्लो पॉयझनिंगसाठी विषारी गोळ्याही द्यायचा. चुलतीच्या प्रेमाने अंधळ्या झालेल्या या व्यक्तीने आपल्या चुलत्याला संपवलं.

मृतदेह सापडला

पीलभीतमधील गजरौला पोलीस स्थानकाच्या हद्दीमधील उगनपूर येथे 2 दिवसांपूर्वी नंदलाल नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. शेतामध्ये नंदलालचा मृतदेह आढळून आला. गावात ही बातमी वाऱ्याच्या वेगाप्रमाणे पसरली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी यासंदर्भात कळवण्यात आलं. ही महिली मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. यानंतर मरण पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीने दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आळा आहे. पोलिसांनी गट बनवून आरोपीचा शोध सुरु केला.

काकी आवडायची

तपासानंतर गजरौला पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या आकाश उर्फ पालू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर या व्यक्तीने चुलती प्रीति देवीच्या प्रेमात आपण ही हत्या केल्याची कबुली दिली. आपल्याला प्रीति फार आवडायची असं आरोपीने पोलिसांना सांगितलं. यासंदर्भात आरोपी त्याच्या चुलतीजवळही बोलला. ही माहिती काकाला समजताच नंदलाल नावाच्या चुलत्याने पुतण्याला मारहाण केली. पुतण्या चुलत्याने अनेकदा मारहाण करायचा, शिव्या द्यायचा. त्यानंतर एकदा पुतण्याने पत्नीला फोन केल्याचं समजल्यानंतर नंदलाल त्याच्या भावाच्या घरी गेला आणि त्याला शिव्या घातल्या. दोघांमध्ये मोठी बाचाबाजी झाली. त्यानंतर नंदलाल दारुच्या नशेत शिव्या घालतच शेतावर गेला आणि रात्री उशीरा झोपी गेला.

काकाला संपवलं

या गोंधळानंतर घरातील सर्वजण झोपी गेले. मात्र आरोपी आकाश रोजच्या या शिवागाळामुळे त्रस्त होता. काका शेतात झोपल्याचं समजल्याने आज काकाला संपवण्याचा प्लॅन आकाशने केला. रात्री मध्यरात्रीनंतर आकाशने नंदलालची हत्या केली. घरातील मोठ्या आकाराचा दांडका वापरुन आकाशने नंदलालवर हल्ला केला. आकाशने 4 ते 5 वेळा नंदलालच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर नंदलाल घरातून पलून गेला. पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारने नंदलाला अटक केली. नंदलालकडून पोलिसांनी गुन्ह्याचं हत्यार जप्त केलं आहे.