Crime News : थोड्याश्या आनंदासाठी पती पत्नीच्या नात्यात विवाहबाह्य संबंधामुळे (extra marital affairs) अनेक अडचणी येतात. अशाच विवाहबाह्य संबंधामुळे एका व्यक्तीला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. एका कॉल गर्लसोबत (Call Girl) विवाहबाह्य संबंध ठेवणे या सरकारी कर्मचाऱ्याला महागात पडले. पत्नीला कर्करोग (Cancer) झाल्याने या व्यक्तीने कॉल गर्लसोबत संबंध ठेवले होते. मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर कॉल गर्लने त्या व्यक्तीविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. यामुळे पोलिसांनी या कर्मचाऱ्याला अटक करुन तुरुंगात टाकले आहे.
पोलिसांची अटक आणि पुन्हा वेश्या व्यवसायास सुरुवात
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) प्रयागराजमध्ये हा सर्व घडल्याचे समोर आले आहे. मात्र त्याआधी हे प्रकरण आझमगढ येथून सुरु झाले होते. आझमगड पोलिसांनी काही वर्षांपूर्वी एक सेक्स रॅकेट समोर आणलं होतं. पोलिसांनी यावेळी एका मुलीला वेश्या व्यवसाय करत असल्याच्या आरोपाखाली पकडण्यात होते. त्यानंतर ही मुलगी प्रयागराजला आली. मात्र इथेही ती सेक्स रॅकेटच्या व्यवसायात अडकली. प्रयागराजला आल्यानंतर तिने एका मुलासोबत लग्नही केले. याचवेळी एक सरकारी कर्मचारी या कॉल गर्लच्या जवळ आला. हळुहळू त्यांच्यात प्रेम वाढू लागलं. यानंतर तरुणीही तिच्या पतीपासून वेगळी राहू लागली.
पत्नीला कॅन्सर झाल्यानंतर तरुणीच्या प्रेमात पडला कर्मचारी
तरुणीने सरकारी कर्मचाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जवळीक वाढवली. यानंतर दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान, 2022 मध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या पत्नीला कर्करोग असल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान कर्मचाऱ्याच्या पत्नीचे निधन झाले. अंत्यसंस्कारावेळी कॉल गर्ल तिथे पोहोचली आणि तिने आपण सरकारी कर्मचाऱ्याची पत्नी असल्याचा दावा केला. यानंतर मोठा वाद झाला. यावेळी तरुणीने या घटनेचा व्हिडीओ प्रयत्न केला मात्र लोकांनी तिचा मोबाईल काढून घेतला. यानंतर तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठत सरकारी कर्मचाऱ्याविरोधात तक्रार नोंदवली. या सर्व प्रकारानंतर त्या व्यक्तीने तरुणीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली.
दरम्यान, यामुळेच दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यानंतर पुन्हा तरुणीने हल्ल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केला. पोलिसांसमोर हे प्रकरण येताच त्यांनी याची माहिती घेतली. मात्र दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सुरुवातील कारवाई केली नाही. यानंतर तरुणीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करु अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत सरकारी कर्मचाऱ्याची तुरुंगात रवानगी केली आहे.