नवी दिल्ली : उत्तराखंडमधून धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. चक्राता येथील दुर्गम भाग असलेल्या तुनी मार्गावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चक्राता येथील भरम खात येथील बायला गावातून विकासनगरकडे जाणारी व्हॅन रविवारी भायला-पिंगुवा रस्त्यालगत नियंत्रणाबाहेर जाऊन खोल दरीत कोसळली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चक्रता एसडीएम, पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. खड्ड्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
चक्राता तालुक्यातील भरम खात येथील बायला गावाकडून विकासनगरकडे जाणारी व्हॅन रविवारी सकाळी पीएमजीएसवायच्या बायला-पिंगुवा मार्गावर गावापासून 400 मीटर पुढे जात असताना खड्ड्यात पडली. या अपघातात व्हॅनवर स्वार असलेल्या 14 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडी खड्ड्यात पडल्याने आरडाओरडा झाला.
चकराता क्षेत्र के अंतर्गत बुल्हाड़-बायला मार्ग पर हुए हृदय विदारक सड़क हादसे पर शोक व्यक्त करता हूँ। ईश्वर मृतकों की आत्मा को शांति और परिजनों को दुःख सहने की शक्ति प्रदान करे।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) October 31, 2021
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याचे बोलले आहे. जखमींना 50-50 हजारांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
स्थानिक लोकांकडून मदतकार्य सुरू
पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी तात्काळ पोहोचले. स्थानिक लोकांकडूनही मदतकार्य सुरू आहे. माहिती मिळताच डेहराडूनहून एसडीआरएफ, जिल्हा पोलीस आणि अग्निशमन दलाचे मदत पथक घटनास्थळी रवाना झाले. एसपी ग्रामीण स्वतंत्र कुमार सिंह यांनी ही माहिती दिली आहे.