जम्मू : Vaishno Devi Shrine Stampede Updates: माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झालेत. घटनास्थळी सुरू असलेले बचावकार्य संपले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वैष्णोदेवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (High-level inquiry ordered into stampede at Vaishno Devi shrine that killed 12, injured 15)
नवीन वर्षाच्या निमित्ताने जम्मूतील वैष्णोदेवी माता मंदिरातून वाईट बातमी आली आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचले होते आणि यादरम्यान माता वैष्णोदेवी भवनात चेंगराचेंगरी झाली. (Vaishno Devi Shrine Stampede) या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्यावतीने मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीर एलजीने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
माता वैष्णोदेवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या आठ जणांची ओळख पटली आहे. या घटनेत जम्मू-काश्मीरमधील नौशेरा राजौरी येथील रहिवासी धीरज कुमार, यूपीच्या गाझियाबाद येथील श्वेता सिंह, दिल्लीचे विनय कुमार आणि सोनू पांडे, हरियाणातील झज्जर येथील ममता, यूपीतील सहारनपूरचे धरमवीर सिंह आणि विनीत कुमार आणि गोरखपूरचे अरुण प्रताप यांचा समावेश आहे. वैष्णोदेवी मंदिर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. चेंगराचेंगरीनंतर यात्रा थांबवण्यात आली होती. माता वैष्णोदेवी भवनसाठी नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.