भंगारात जाणार २० वर्षे जुन्या व्यावसायिक गाड्या, PMO कडून मिळाली परवानगी

जुन्या गाड्या रस्त्यावरून हटवून भंगारात टाकण्याच्या बहुप्रतिक्षीत निर्णयाला पंतप्रधान कार्यालयातून मंजुरी देण्यात आली.

Updated: Mar 17, 2018, 11:01 AM IST
भंगारात जाणार २० वर्षे जुन्या व्यावसायिक गाड्या, PMO कडून मिळाली परवानगी  title=

नवी दिल्ली : जुन्या गाड्या रस्त्यावरून हटवून भंगारात टाकण्याच्या बहुप्रतिक्षीत निर्णयाला पंतप्रधान कार्यालयातून मंजुरी देण्यात आली.

एका उच्च स्तरीय बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. १ एप्रिल २०२० पासून या निर्णय लागू होणार आहे. २० वर्षाहून जुन्या 

अंमलबजावणीची घोषणा

 या धोरणाच्या अंतर्गत २० वर्षांहून जुन्या व्यावसायिक वाहनांना रस्त्यावरून हटविणयात येणार आहे. या गाड्यांचे भाग भंगारात जाणार आहेत.

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जुनी वाहन भंगारात टाकण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची घोषणा करण्यात आला. 

एप्रिल २०२० पॉलिसी लागू 

या धोरणास पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सैद्धांतिक मान्यता दिली आहे.

एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या संदर्भात माहिती दिली. एप्रिल २०२० पासून लागू होईल आणि व्यावसायिक वाहनांचे वय २० वर्ष निश्चित करण्यात आले आहे.