धुक्यामुळे दिल्लीत झालेल्या विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ

धुके आणि विषारी धुरामुळे दिल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर धुक्यामुळे एक धक्कादायक अपघात झाला आहे. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.

Updated: Nov 9, 2017, 05:16 PM IST
धुक्यामुळे दिल्लीत झालेल्या विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ title=

नवी दिल्ली : धुके आणि विषारी धुरामुळे दिल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर धुक्यामुळे एक धक्कादायक अपघात झाला आहे. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.

उत्तर भारतामध्ये गुरूवारची पहाटही गडद धुक्यामध्ये उजाडली असून दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांना धुक्याने वेढा घातला. यामुळे दिल्ली आणि एनसीआर पट्ट्यातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशात त्या विचित्र अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

बुधवारी सकाळी आग्रा – नोएडा यमुना एक्स्प्रेसवेवर विचित्र अपघात झाला. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिली असून यात १२ जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. यमुना एक्स्प्रेसवेवरील अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.