उपराष्ट्रपती निडवडणूक: विरोधी पक्षाच्या बैठकीला जेडीयू नेते राहणार गैरहजर

उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर उद्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत जेडीयूचे अध्यक्ष नीतीश कुमार आणि वरिष्ठ नेते शरद यादव हे दोघेही सहभागी नाही होणार आहेत. उद्या नितीश कुमारांनी त्यांच्या पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि आमदारांची बैठक बोलावली आहे.

Updated: Jul 10, 2017, 04:26 PM IST
उपराष्ट्रपती निडवडणूक: विरोधी पक्षाच्या बैठकीला जेडीयू नेते राहणार गैरहजर title=

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर उद्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत जेडीयूचे अध्यक्ष नीतीश कुमार आणि वरिष्ठ नेते शरद यादव हे दोघेही सहभागी नाही होणार आहेत. उद्या नितीश कुमारांनी त्यांच्या पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि आमदारांची बैठक बोलावली आहे.

सोनिया गांधींकडून विरोधी पक्षनेत्यांची बैठक सकाळी ११ वाजता होणार आहे. संसद भवनांच्या लायब्रेरीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत १८ पेक्षा अधिक पक्षाचे नेते सहभागी होतील असं बोललं जातंय. बैठकीत उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीवर चर्चा होणार आहे. १७ जुलैपासून सुरु होणाऱ्या संसद भवनाच्या सत्रावरही चर्चा होणार आहे.