हृदयविकाराचा झटका येताच 'तो' कलाकार स्टेजवर कोसळला आणि...; थरकाप उडविणारा Video

Viral Video : लग्न समारंभात नाचत असताना, कधी जीममध्ये लोक अचानक चकर येऊन पडतं आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्यांना मृत्यू घोषित करण्यात येतं...

Updated: Dec 24, 2022, 08:59 AM IST
हृदयविकाराचा झटका येताच 'तो' कलाकार स्टेजवर कोसळला आणि...; थरकाप उडविणारा Video title=
video heart attack while a folk artist is performing on stage karnataka news nmp

Heart Attack Video : गेल्या काही वर्षांपासून लोकांवरील कामाचा तणाव खूप वाढला आहे. त्यात खाण्यापिण्याची चुकीच्या सवयी, व्यायामचा अभाव, प्रकृतीकडे दुर्लक्ष आणि मद्यपानचं वाढतं प्रमाण...या आणि अशा अनेक कारणामुळे लोकांना चालता बोलता हृदयविकाराचा झटका येत आहे. 2022 चा विचार केला तर हे लक्षात येईल या वर्षभरात हृदयविकाराच्या धक्कामुळे बॉलिवूड अभिनेता राजू श्रीवास्तव, कृष्णकुमार कुन्नथ म्हणजे केके, दीपेश भान, सिद्धांत वीर सूर्यवंशी...

आणि तो स्टेजवर कोसळला

अजून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. स्टेजवर नाटक करत असताना एक कलाकार अचानक स्टेजवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्या कलाकाराला मृत घोषित करण्यात आले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हा मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. 

कुठे घडली ?

कर्नाटकातील मंगळुरूमध्ये कातिलू जत्रा सुरू आहे. महाभारतावर आधारीत लोकनाट्य सुरु होतं.. यावेळी नाटकातील शिशुपालाची भूमीका साकारणाऱ्या गुरुवप्पा बायरु यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते स्टेजवरच कोसळले.. गुरुवप्पा बायरू असं त्या कलाकाराचे नाव असून त्यांचं वय 58 इतके होते. 

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. एका लग्न समारंभात चार आजी स्टेजवर नाचत होत्या. त्यातील एक आजी अचानक कोसळली. त्यानंतर रुग्णालयात नेलं असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाल्याचं समजलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटना वाढल्या आहेत. गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू असो किंवा लग्न मंडपात नाचत असताना क्षणात हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू. वाढत्या ताणतणावामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. त्यामुळे सगळ्यांनी वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घ्या. 

Heart Attack येण्यापूर्वी शरीरात ही लक्षणे दिसतात?

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला छातीत दुखणे, जबडा किंवा दातांमध्ये दुखायला लागतं, श्वास घेण्यास अडचण येते, घाम येणे, गॅस बनणे, चक्कर येणे, डोके फिरणे, अस्वस्थ वाटणे आणि मळमळ अशा तक्रारी सुरू होतात.

कोणत्या वयात हृदयविकाराचा झटका येतो?

हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयाच्या व्यक्तीला येऊ शकतो, परंतु 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. 

कधी येतो झटका?

जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा ब्लॉक होतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. कधीकधी हे कोरोनरी धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल आणि चरबी जमा झाल्यामुळे देखील होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना कोरोनरी धमन्या म्हणतात. आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की, तुम्‍हाला हार्ट अटॅकची लक्षणे दिसल्‍यास, त्‍याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.