रोटीवर थुंकून तंदूरमध्ये टाकतानाचा व्हीडिओ व्हायरल

या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.    

Updated: Dec 5, 2021, 10:54 PM IST
रोटीवर थुंकून तंदूरमध्ये टाकतानाचा व्हीडिओ व्हायरल

मुंबई : प्रत्येक पार्टीत, कार्यक्रमात जेवणात तंदूरी रोटी ही हमखास असते. प्रत्येक जण ही रोटी चवीने खातो. मात्र सोशल मीडियावर असा एक व्हीडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही कायमचंच तंदूरी रोटी खाण्याचं सोडून द्याल. हा व्यक्ती तंदूरमध्ये रोटी टाकण्याआधी त्याला थुंकी लावतोय. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (video of a man spitting on tandoori roti and then throwing it in the tandoor went viral) 

संतापजनक प्रकार कुठला? 

हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशमधील मेरठमधील आहे. एका साखरपुडा संमारंभात हा प्रकार आहे.  या व्हायरल व्हीडिओत हा विकृत रोटीवर थुंकून नंतर ती तंदूरमध्ये टाकताना दिसतोय. तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या या समारंभात एकानं रोटी बनवतानाचा हा व्हिडिओ लपून शूट केला. नौशाद असं या विकृताचा नाव आहे.  

रोटी बनवणारा नौशाद नावाचा हा माणूस चक्क रोटीवर थुंकत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नौशादला अटक केलीये. आपण रोटीवर थुंकलो नसल्याचा त्याचा दावा असला तरी या व्हिडिओमध्ये ही किळसवाणी कृती दिसतेय. पोलिसांनी या साखरपुड्यातील आणखी व्हिडिओ मिळवले असून तपास सुरू आहे.