ओडिशामध्ये (Odisha) आजारी पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी (Padma Shri Kamala Pujari) यांना कटक जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका महिलेने जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले. कमला पुजारी यांना 2019 मध्ये सेंद्रिय शेतीसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी पद्मश्री पुरस्कार कमला पुजारी यांना आजारी असतानाही जबरदस्तीने नाचण्यास सांगितले.
आजारी असलेल्या कमला पुजारी (Kamala Pujari) अवस्थेत हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या एका महिलेने हे धक्कादायक कृत्य केले. या प्रकाराविरोधात आहे.
कमला पुजारी म्हणाल्या की, माझी तब्येत खराब असूनही एका महिलेने मला तिच्यासोबत (Mamata Behera) नाचायला लावले. तिने मला कॅमेऱ्यासमोर 'धेमसा नृत्य' करायला सांगितले. कमला पुजारी यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. किडनीच्या आजारामुळे त्यांच्यावर कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
कमला पुजारी यांनी कोरापुट जिल्ह्यातील वृत्तवाहिन्यांना सांगितले की, "मला नाचायचे नव्हते पण मला ते करायला भाग पाडले गेले. मी वारंवार नकार दिला पण त्यांनी माझे ऐकले नाही. मला नाचायचे नव्हते. मी आजारी आणि थकले होते."
#WATCH | Odisha: Ailing Padma Shri awardee Kamala Pujari allegedly forced to dance by a social worker in a hospital in Cuttack district
She was given Padma Shri in 2019 for organic farming
(Source: Viral video) pic.twitter.com/I2wJ7ykPXI
— ANI (@ANI) September 3, 2022
दरम्यान, आता याप्रकरणी आदिवासी समाजाची संघटनेने या नृत्य करायला भाग पाडणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. सामाजिक महिला कार्यकर्त्याने कमला पुजारी यांना आजारपणात नाचण्यास भाग पाडले इतकेच नाही तर परजा समाजाचा अपमानही केला, असे परजा समाजाने म्हटलं आहे.