VIDEO : अमानुष कृत्य! गाडीला टेकून उभा राहिला म्हणून 6 वर्षांच्या चिमुरड्याच्या छातीत मारली लाथ

Trending Kerala Video : सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडीओ समोर (shocking video on social media) आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग मस्तकात जातोय. काय चूक या मुलाची...बस तो पांढऱ्या शुभ्र कारला टेकून उभा होता ते..बस्स एवढंच काय तिची चूक...

Updated: Nov 4, 2022, 11:28 PM IST

man_kicks_boy

Viral video : सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडीओ समोर (shocking video on social media) आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग मस्तकात जातोय. काय चूक या मुलाची...बस तो पांढऱ्या शुभ्र कारला टेकून उभा होता ते..बस्स एवढंच काय तिची चूक...मग या पैशाने श्रीमंत माणसाने काय करावं, तो व्यक्ती या चिमुरड्याकडे येतो आणि त्याचा छातीवर लाथ मारतो...हो, छातीवर लाथ मारतो. या व्यक्तीचं अतिशय निर्दयी आणि अमानुष कृत्य परिसरातील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालंय. (Video Trending on social media man kicks 6 year old boy nmp)

मनाची श्रीमंती नसेल तर काय अर्थ...

हो जर तुमच्याकडे मनाची श्रीमंती नसेल तर तुमच्याकडे कितीही पैसे असो त्याला काही अर्थ नाही. 6 वर्षांच्या या लहान मुलाला काय माहिती त्याचं एक साधं कृत्य त्याचासोबत एवढी भयानक घटना घडेल. प्रत्येकाला आपली दोन चाकी असो किंवा चार चाकी गाडी खूप प्रिय असते. पण याचा अर्थ असा होतं नाही, की तुमच्या कारला कोणी नसतं टेकलं तरी तुम्ही रागाच्या भरात त्याचा अंगावर धावून जालं. आपण अनेक वेळा पाहिलं आहे. रस्त्याच्या बाजूला कार उभी असेल तर आपण जाऊन त्याला टेकून उभे राहतो. कार चालकांना ते आवडतं नाही. म्हणून काय ते मारायला येणार. हा चिमुकल्या तर गुपचूप उभा होता. त्याचं कारला असं टेकून उभे राहिल्यामुळे कारचं काही नुकसानही झालं नसेल. तरीदेखील त्या चालकाला एवढा राग का आला. श्रीमंतचं भूत म्हणायला हवं की अजून कसा माज हा...चार पैसे काय आपल्याकडे आले म्हणून काय आपण माणुसकी विसरुन जाणार का? 

कारचालकावर कारवाई 

ही घटना केरळातील (kerala) किपोन्नयामपालममधील आहे. तर कारचालक शिहशाद याच्याविरोधात पोलियांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे. पीडित लहान मुलगा हा राजस्थानच्या एका श्रमिक कुटुंबाचा सदस्य (national migrant boy) आहे. हा व्हिडीओ व्हायरल (video viral) झाल्यानंतर  राज्याचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी घटनेची दखल घेतली आहे. क्रुरतेचा कळस असलेलं हे कृत्य करणावर योग्य ती कारवाई होईल. पुन्हा अशा घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाईलं असं आश्वासन, मंत्र्यांनी दिलं आहे.