VIDEO : 'जीएसटी'च्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट

जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचं कामही सुरू झालंय. गुजरात क्विन ट्रेनमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 1, 2017, 03:39 PM IST
VIDEO : 'जीएसटी'च्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट  title=

नवी दिल्ली : जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचं कामही सुरू झालंय. गुजरात क्विन ट्रेनमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. 

देशात आजपासून जीएसटी लागू झाल्यानंतर याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रवासात पाहायला मिळाला. चक्क प्रत्येक रेल्वे तिकीटामागे टीसी जीएसटीच्या नावाखाली प्रवाशांकडून पैसे 
उकळताना कॅमेऱ्यात कैद झालाय. 

दरम्यान, प्रवाशांनी याबाबत टीसीला जाब विचारला. मात्र, टीसीला प्रवाशांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. शिवाय बदललेल्या तिकीट दरांची रेल्वेचे परिपत्रकही दाखवता आलं नाही. 

मात्र, जीएसटी १ जुलैपासून लागू करण्यात आला असताना अगोदरच काढलेल्या तिकीटांवर जीएसटी कसा काय आकारला जाऊ शकतो? असा जाब थेट प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला विचारलाय.