सौदामिनी आधी कुंकू लाव! VIDEO पाहून तुम्हालाही अशोक सराफची आठवण येईल

मंगळसूत्र त्याचं आणि कुंकु कुणाच? पाहा हसू न आवरता येणारा हा VIDEO

Updated: Sep 1, 2022, 08:31 PM IST
सौदामिनी आधी कुंकू लाव! VIDEO पाहून तुम्हालाही अशोक सराफची आठवण येईल   title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओतील अनेक व्हिडिओ पाहून आपले मनोरंजन होत असते. मात्र यामधील काही व्हिडिओ असे असतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतील घटना पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तसेच हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला अभिनेते अशोक सराफ यांच्या 'सौदामिनी आधी कुंकू लाव' या डायलॉगची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं या व्हिडिओत असं काय आहे ? आणि अशोक सराफच्या डायल़ॉगची आठवण का येतेय ते जाणून घेऊय़ात. 

अभिनेता अशोक सराफ यांनी भूमिका साकारलेला ‘माझा पती करोडपती’ हा चित्रपट खुप गाजला होता. या चित्रपटांमध्ये निळू फुले आणि अशोक सराफ या जोडीने धमाल आणली होती. माझा पती करोडपतीमध्ये सौदामिनी रणगाडे अर्थातचं सुप्रिया पिळगावकरचा खोटा नवरा बाजीराव रणगाडेची भूमिका साकारून धमाल उडवून दिली. याचं चित्रपटातील अशोक यांचा ‘सौदामिनी आधी कुंकू लाव’ हा डायलॉग खुप लोकप्रिय ठरला होता. हा किस्सा आधी सांगण्या मागचं कारण म्हणजे अशी घटना एका व्हायरल व्हिडिओत घडली आहे.  

व्हिडिओत काय? 
व्हायरल व्हिडिओत एक लग्न सोहळा सुरु आहे. या लग्न सोहळयात नवरा नवरी खुर्चीवर बसले आहेत. दोघांच लग्न पार पडल्याचे दिसत आहेत. लग्न मंडपातील सर्व पाहूणे मंडळीची नजर नवीन जोडप्याकडे लागली आहे. इतक्यात दोघा जोडप्यांच्या मागून एक तरूण येऊन नवरीच्या डोक्यावर कुंकु लावतो. एक नाही दोन नाही तर अनेकदा तो कुंकु लावतो. व्हिडिओतला हा भाग पाहुन अनेकांना अशोक यांचा ‘सौदामिनी आधी कुंकू लाव’ हा डायलॉग आठवतोय. तसेच हा लग्नातला हा व्हिडिओ पाहुन अनेकांना हसू आवरता येत नाही. 

विशेष म्हणजे या व्हिडिओत तरूण कुंकु लावत असताना नवऱ्याचे लक्ष दुसऱ्याच बाजूने होते. इतक्यात तरूणाने स्टेजवर येऊन आपलं काम केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.