Woman slaps eve-teaser inside bus Video : सोशल मीडियावर एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये सार्वजनिक बसमध्ये (Bus Viral Video)एक तरुणी एका व्यक्तीला मारताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने महिला नको त्या जागी स्पर्श केला होता. तिने त्याला इशाराही दिला होता. तरीदेखील त्याचे अश्लील चाळे थांबत नसल्याने अखेर तिने आपलं रौद्र अवतार दाखवले. त्या व्यक्तीला तिने दे धपाधप प्रसाद दिला. (women video viral)
कर्नाटकातील मंड्यामधील एका महिलेसोबत बसमधून प्रवास करताना एका व्यक्तीने गैरवर्तन केलं. त्या व्यक्तीला महिलेने राग दिल्यावरही तो तिची छेडछाड करत होता. तिच्या शरीराला नको त्या ठिकाणी त्याने हात लावल्याने ती तरुणी संतापली आणि तिने बसमध्येच त्याला मारहाण केली. तरुणीचा संताप पाहून त्या व्यक्तीने तिथून पळ काढला. (video viral Woman slaps eve teaser in bus in Karnatakas Mandya video goes trending now )
या बसमधील एका प्रवासाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. धक्कादायक म्हणजे सहप्रवाशांना व्हिडीओ काढल्याला वेळ होता पण त्या तरुणीला त्यांनी मदत केली नाही. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरवर वाऱ्यासारखा पसरत आहे. ट्वीटरवरील Imran Khan या व्यक्तीच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं आहे की, ''मंड्यातील केआर पीट बसस्थानकावर एका महिलेसोबत इव्ह टीझर करणाऱ्याला मारहाण केली. महिला लोकल बसमध्ये प्रवास करत होती. अज्ञात व्यक्ती तिची छेड काढत होता आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. तिने इशारा दिल्यानंतरही तो तिला स्पर्श करत होता.''
A woman beat her eve teaser at KR Pete bus stand in #Mandya. The lady was travelling in the local bus - the unidentified man was teasing her and tried to touch her inappropriately. Even after she warned- he continued to touch her (1/2) pic.twitter.com/69wEWFuTgZ
— Imran Khan (@KeypadGuerilla) June 3, 2023
गेल्या काही दिवसांपासून महिला सार्वजिनक ठिकाणी सुरक्षित नाही असं चित्र दिसतं आहे. महिला किंवा तरुणीवर सार्वजनिक ठिकाणी दृष्य कृम करतानाचा त्यांचा मदतीला कोणी येतं नाही.
नवी दिल्लीतील साहिल खानने सर्वासमोर साक्षीची चाकू भोसकून निर्घृण (Sakshi Murder Case) हत्या केली. माणसुकीचा अभाव या अशा अनेक घटनांमध्ये दिसून येतं आहे.