बंगळुरु : यूनायटेड ब्रेवरीज होल्डींग ही कंपनी विजय माल्ल्याच्या यूबी समुहाची होल्डींग कंपनी आहे. या कंपनीने गुरूवारी कर्नाटक कोर्टात सांगितले की, त्यांचे शेअर आणि संपत्तीची एकूण व्हॅल्यू १२४०० कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विजय माल्ल्या सहज त्याच्यावरील कर्ज फेडू शकतो.
बंगळुरूच्या एका कोर्टाने १९ जानेवारीला फरार विजय माल्ल्या आणि १८ अन्य विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. चौकशी समितीने या लोकांविरोधात गुंतवणुकीचे तथ्य लपवल्याचा आरोप लावलाय. माल्ल्यासोबतच ज्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आलंय त्यात यूबी ग्रुपचे मुख्य फायनान्स अधिकारी ए.के.रवि नेदुंगडी, डेक्कन एविएशनचे प्रमोटर जी.आर. गोपीनाथ, एंबिट प्रायव्हेट लिमिटेडचे अशोक वाधवासही कंपनीशी निगडीत अनेक चार्टर अकांऊटंट आहेत.
दिल्लीच्या एका न्यायालयाने गेल्या ४ जानेवारीला उद्योगपती विजय माल्ल्याला ‘फरार’ घोषित केले होते. यावेळी कोर्ट म्हणाले होते की, विजय माल्ल्या ३० दिवसांच्या आत कोर्टात हजर झाले नाही. तसेच त्यांचे प्रतिनिधीही आले नाहीत. त्यामुळे कोर्ट माल्ल्याला फरार घोषित करतंय.