Stock to Pick | दमदार रिटर्न देणारे हे दोन शेअर; शॉर्ट टर्म साठी गुंतवू शकता पैसे

शेअर मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म  साठी गुंतवणूक करू शकता. जर शॉर्ट टर्ममध्ये जास्त कमाई करण्याच्या संधीच्या शोधात असाल तर,  मार्केट एक्स्पर्ट विकास सेठी यांनी निवडलेल्या शेअरवर गुंतवणूक करू शकता. 

Updated: Sep 1, 2021, 10:48 AM IST
Stock to Pick | दमदार रिटर्न देणारे हे दोन शेअर; शॉर्ट टर्म साठी गुंतवू शकता पैसे

मुंबई : शेअर मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म  साठी गुंतवणूक करू शकता. जर शॉर्ट टर्ममध्ये जास्त कमाई करण्याच्या संधीच्या शोधात असाल तर,  मार्केट एक्स्पर्ट विकास सेठी यांनी निवडलेल्या शेअरवर गुंतवणूक करू शकता. विकास सेठी यांनी आज शॉर्टटर्म साठी दमदार शेअर्सची निवड केली आहे. 

विकास सेठी यांनी  Apcotex Industries आणि Birla Corp च्या शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 

Apcotex Industries वर फोकस

या कंपनीची सुरूवात Asian Paints Division ने झाली होती. कंपनी पॉलिमर बनवते. जे फुटवेअर आणि ऑटो कंपोनंटमध्ये कामी येतात. याशिवाय कंपनी सिंथेटिक रबर सुद्धा बनवते.

Apcotex Industries
CMP 348.90
TARGET 365
SL 325

कसे आहेत फंडामेंटल्स
 विकास सेठी यांनी म्हटले आहे की,  कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 15 टक्के आहे.  कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. जून तिमाहीमध्ये FIIsने हिस्सेदारी खरेदी केली आहे. जून तिमाहीमध्ये कंपनीने 21 कोटी रुपयांचा नफा सादर केला आहे.
 
 Birla Corp

 ही एक मिडकॅप मधील सिमेंट कंपनी आहे. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. . जून तिमाहीमध्ये कंपनीने 142 कोटींचा नफा कमावला होता. मागील वर्षी देखील कंपनीला 66 कोटींचा नफा झाला होता.
 
 Birla Corp
CMP - 1349
Target - 1425
Stop Loss - 1310