कोहिमा : नागालँडची राजधानी कोहिमा इथं ५ ऑक्टोबर रोजी 'मिस कोहिमा ब्युटी पीजेंट २०१९'चा फायनल राऊंड पार पडला. या सौंदर्य स्पर्धेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये सौंदर्य स्पर्धेतील एका मॉडेल तरुणीला 'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुला आमंत्रित केलं, तर तू त्यांना काय म्हणशील?' असा प्रश्न विचारला गेला. यावर तरुणीनं दिलेल्या उत्तराची अनेकांनी प्रशंसा केली. तर काही जणांना हे उत्तर थोडं खटकलंही... परंतु, या प्रश्नाची आणि उत्तराची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
Miss Kohima (Nagaland) 2019 beauty pageant contestant was asked:
‘If PM of our country Modi invites you to chat with him, what would you say?"
She replied: “If I were invited by the PM of India, I would tell him to focus more on women instead of cows.” pic.twitter.com/SOh3K3HgdA
— Uzair Hasan Rizvi (@RizviUzair) October 14, 2019
तीन स्पर्धकांसोबत प्रश्नोत्तराचा राऊंड सुरू होता. यामध्ये मिस कोहिमा ब्युटी पीजेंट २०१९ ची १८ वर्षीय सेकंड रनर अप विकोनू साचू हिला परिक्षकांनी मोदींबाबत प्रश्न विचारला. यावर विकोनू हिनं म्हटलं की 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला भेटण्यासाठी आमंत्रित केलं तर मी त्यांना गाईंऐवजी महिलांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यासाठी सांगेन'.
विकोनू साचू हिचं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. 'मिस कोहिमा ब्युटी पीजेंट २०१९'मध्ये २३ वर्षीय ख्रीएनुओ लिआजेत्सु हिनं 'मिस कोहिमा २०१९'चा खिताब आपल्या नावावर केला. तर १९ वर्षीय ख्रीलीविएनुओ सुहो ही फर्स्ट रनर अप ठरली.