माशांमुळं 'या' गावातील मुलं आहेत अविवाहित, लग्नासाठी कोणी मुलगीच देईना!

Trending News: माशांमुळं घरातील मुलाचे लग्न रखडल्याची गोष्ट तुम्ही कधी ऐकलीयेत का? देशातील एका गावात ही घटना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 1, 2023, 12:53 PM IST
माशांमुळं 'या' गावातील मुलं आहेत अविवाहित, लग्नासाठी कोणी मुलगीच देईना! title=
village facing serious house flies infestations due to poultry farms

Trending News In Marathi: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षणांपैकी एक असतो. लग्न करताना नवऱ्या मुलाचा व मुलीचा स्वभाव, शिक्षण, कुटुंब घर, नोकरी या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी पाहूनच लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र, भारतात एक असे गाव आहे जिथे माशांमुळं तरुणांची लग्न रखडली आहेत. मुलींचे वडील या गावात मुली द्यायलाय तयार नाहीयेत. शेती, संपत्ती, शिक्षण-नोकरी सगळं काही असूनही यागावातील मुलांना लग्नासाठी नोकरी मिळत नाहीयेत. याचे कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल. 

लग्नासाठी स्थळच येत नाहीत

उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात रुदवार नावाचे एक गाव आहे. या गावातील मुलं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मात्र गावात मुलीच यायला तयार नाहीयेत. याचे कारण आहे ते म्हणजे माशा. इथे माशांची इतकी दहशत आहे की मुली थेट लग्नालाच नकार देतात. या गावातील प्रत्येक घरात भरपूर माशा घोंगावत असतात. घरातील प्रत्येक सामानावर माश चिकटलेल्या असतात. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. गावातील असे एकही ठिकाण नाही जिथे माशांचा त्रास नाहीये. 

मुलींच्या वडिलांनी नाकारलं स्थळ

खाण्या-पिण्याच्या पदार्थांवरही माशा बसलेल्या असतात. त्यामुळं गावातील लोक व्यवस्थित जेवणही करु शकत नाही. म्हणूनच कोणीच या गावात मुलगी द्यायला तयार नाही. एका अहवालानुसार, स्थानिक महिलांनी म्हटलं आहे की गावात कोणच मुलगी द्यायला तयार नाही. ज्यांचे लग्न झाले आहे तेदेखील इथे राहण्यास तयार नाही. तर माशांचा भीतीने नातेवाईकही घरी येण्यास धजावतात. 

... म्हणून वाढला माशांचा त्रास

माशांचा त्रास वाढण्यामागे गावातील पोल्ट्री फॉर्म असल्याचा दावा केला जातो आहे. गावात पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय हळूहळू वाढत आहे. त्याचा आर्थिक फायदाही होत आहे. नफा मिळवण्यासाठी हल्ली प्रत्येकजण पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय करत आहे. तर, कोंबडी मेल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता उघड्यावरच फेकुन देण्यात येतात. त्यामुळं गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

गावकरी बेजार

माशांचा त्रासाने गावकरी बेजार झाले आहेत. प्रशासनानेही यावर हात वर केले आहेत. सुरुवातीला ज्यांचा पॉल्ट्रीचा व्यवसाय आहे ते गावात औषधी द्रव्ये फवारत होते. मात्र, आता याकडे कोणीही लक्ष देत नाही. परिणामी गावात माशांचा त्रास असह्य होऊ लागला आहे. माशा जेवण्याच्या पदार्थांवरही घोंगावत असल्याने गावात रोगराई वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येते आहे. माशांच्या या त्रासाने गावकरी हैराण झाले आहेत. तर, या समस्येवर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.