Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला फक्त 100 किलोग्रॅम वजनाने डिसकॉलिफाय करण्यात आलं. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर संपूर्ण देशवासियांनी हळहळ व्यक्त केली. देशभरातली प्रत्येक व्यक्तीने विनेशचं कौतुक केलं आहे. तर, कलाकारांनीही तिला धीर दिला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीही विनेश फोगाटबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, हेमा मालिनी यांच्या त्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या की, विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. या घटनेमुळं आपल्या प्रत्येकाला शिकण्याची गरज गरज आहे. विनेश फोगाट अंतिम सामन्याच्या आधीच 100 ग्रॅम वजनाच्या फरकाने ऑलिम्पिक फायनलमधून अपात्र ठरवली गेली. यातून लक्षात येतं की तुमचं वजन नियंत्रणात ठेवणे किती गरजेचं आहे. खूप वाईट वाटतंय की 100 ग्रॅम वजनाच्या फरकाने विनेश अपात्र ठरली, असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.
विनेश फोगाट अपात्र ठरली हा घटनेने आपणही धडा घेतला पाहिजे. आपलं वजन व्यवस्थित ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. खासकरुन कलाकार आणि महिलांनी याबाबत सजग असलं पाहिजे. कारण 100 ग्रॅम वजनदेखील किती परिणामकारक ठरु शकतं, असंही हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे. तसंच, विनेश फोगट ऑलिम्पिकमधून बाहेर पडली याचे आम्हाला खूप दुखः आहे. मला तर वाटतंय की तिने आत्ताच तिचे 100 ग्रॅम वजन कमी करावे. मात्र तिला आता ही संधी मिळणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
हेमा मालिनी यांच्या या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. हेमा मालिनी मॅम हे काय बोलत आहेत? असा प्रश्न एकाने केला आहे. तर, एकाने म्हटलं आहे की, मला खरंच कळत नाही की लोक अशा व्यक्तीला कसं मत देऊ शकतात. एका युजरने म्हटलं आहे की, तुम्हाला ऑलिम्पिक खेळांडूंचे स्ट्रीक्ट डाएट आणि ट्रेनिंग याबद्दल थोडं तरी माहितीये का? अशी प्रतिक्रिया देताय जणू ती दररोज समोसे आणि आइस्क्रीम खातेय. योग्य आहाराबद्दल माहिती देणे चांगलंच आहे. पण ही ती योग्य वेळ आणि जागा नाहीये, असं एकाने म्हटलं आहे.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विनेशने कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचं म्हटलं आहे. विनेशच्या या पोस्टनंतर क्रिडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अवघ्या काही किलोग्रॅम वजनामुळं अंतिम सामन्यातून डिसकॉलिफाय झाल्यानंतर निराश झालेल्या विनेशने हा इतका मोठा निर्णय घेतला आहे. तिने एक्सवर पोस्ट करत निवृत्तीचे संकेत दिले आहे. तिने म्हटलं आहे की, आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली... मी पराभूत झाले! मला माफ कर आई, तुझं स्वप्न, माझी हिंमत सारं काही तुटलं आहे. माझ्याकडे आता याहून अधिक ताकद राहिलेली नाही!" असं विनेशने म्हटलं आहे. तसेच याच पोस्टमध्ये पुढे विनेशने, "कुस्तीचा निरोप घेतेय... 2001-2024" असं म्हटलं आहे. तसंच, मी तुम्हा सर्वांची कायम ऋणी राहिन, मला माफ करा, असं विनेशने म्हटलं आहे.