'कायद्याचं पालन न करणे आपल्या रक्तात भिनलं आहे' - सरन्यायाधीश

ही वृत्ती आता आपल्याला रक्तातच भिनली आहे', असं सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी म्हटलं आहे.

Updated: Jul 31, 2017, 05:18 PM IST
'कायद्याचं पालन न करणे आपल्या रक्तात भिनलं आहे' - सरन्यायाधीश title=

नवी दिल्ली : सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी गंभीर शब्दात कायदे तोडण्याविषयी खंत व्यक्त केली आहे. 'कायदे तोडणे आणि त्यांचा अवमान करणे हे आता हळूहळू आपल्या संस्कृतीचा भाग होत आहे. ही वृत्ती आता आपल्याला रक्तातच भिनली आहे', असं सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी म्हटलं आहे.

मल्याने न्यायालयाच्या आदेशानंतरही न्यायालयात हजर राहण्याबाबत वारंवार नकार दिला आहे. भारतातील बॅंकांना तब्बल ९ हजार कोटींना चुना लावून मल्ल्या लंडनमध्ये पळून गेला आहे. खेहर यांची ही टिपण्णी विजय मल्ल्याकडून न्यायालयाच्या आदेशांना पायदळी तुडवली आहे, अशा प्रकरणांनाही ही टिप्पणी अधिक लागू पडते.

'जर तुम्हाला वाटत असेल की, आपल्या देशाची प्रगती व्हायला हवी, तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कायद्यांचे पालन हे करायलाच हवे. कायदे तोडणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडून दिले जाणार नाही, मग तो कोणीही असो', अशा स्पष्ट शब्दांत जस्टिस खेहर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणी दरम्यान खेहर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे एका वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

सुनावणी दरम्यान,  जस्टिस खेहर यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, कायदे तोडण्याची आता आपल्याला सवय झाली आहे. हे आता आपल्या रक्तातच भिनले आहे. दिल्लीतल्या लाजपतनगरमधील एका संस्थेचा प्रमुख आपल्या घरच्या इमारतीचा वापर हा व्यावसायिक कारणांसाठी करीत होता, यावर सरन्यायाधीश बोलले.