महागाईनं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! शाकाहारी ताट 10 टक्क्यांनी महागल्यानं गृहिणींचं कोलमडलं बजेट

Rice Roti Rate: रिसर्च फर्म क्रिसिलचे मासिक 'राईस रोटी रेट'ने यासंदर्भात महत्वाचा अहवाल दिला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 6, 2024, 07:54 AM IST
महागाईनं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! शाकाहारी ताट 10 टक्क्यांनी महागल्यानं गृहिणींचं कोलमडलं बजेट title=
Veg Thali Expensive

Rice Roti Rate: मध्यमवर्गीयांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. रोजच्या जेवणासाठी लागणारे पदार्थ महाग झाले आहेत. मागच्या जून महिन्यात मध्यमवर्गीयांना कोणताच दिलासा मिळाला नव्हता. तर या महिन्यातही शाकाहारी ताटातील पदार्थ महागलेले दिसत आहेत.रिसर्च फर्म क्रिसिलचे मासिक 'राईस रोटी रेट'ने यासंदर्भात महत्वाचा अहवाल दिला आहे. त्यानुसार शाकाहारी थाळी 10 टक्क्यांनी महाग झालीय. तर नॉन व्हेज थाळीत 4 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. 

यावर्षीच्या जून महिन्यात खूप सारे बदल झाले. केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आले. पण सर्वसामान्यांना झटका बसलाय. कारण मागच्या जूनमध्ये आलं 59 टक्के, कांदा 46 टक्के आणि टोमॅटो 30 टक्क्यांनी महागला आहे. एवढेच नव्हे तर तांदळाची किंमत 13 टक्क्यांनी वाढली आहे. हे सर्व पाहता शाकाहारी थाळी तयार करण्याची किंमत 10 टक्क्यांनी वाढलीय. दुसरीकडे बॉयलर चिकन स्वस्त झाल्याने मांसाहारी किंवा नॉन व्हेज थाळीची किंमत 4 टक्क्यांनी कमी झालीय. 

शाकाहाऱ्यांना टेन्शन, चिकन खाणाऱ्यांची मज्जा 

सध्या शाकाहारी खाणाऱ्यांना खिसा आणखी थोडा रिकामी करावा लागणार आहे. कारण व्हेज थाली सलग कमी होऊ लागली आहे. मागच्या जून महिन्यात एक व्हेज ताट तयार होण्यासाठी लागणाऱ्या खर्चात या महिन्यात त्यामध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कांदा, लसूण, टोमॅटो पासून तांदूळ, डाळी सर्व महागलंय. दरम्यान व्हेज थालीच्या तुलनेत नॉन व्हेज थाली 4टक्क्यांनी कमी झालीय. गेल्यावर्षी या महिन्यात झालेल्या खर्चाशी याची तुलना केली जात आहे. 

का महागली व्हेज थाली? 

क्रिसिलच्या रोटी राईस रिपोर्टनुसार, जून महिन्यात कांद्याच्या दरात 59 टक्क्यांनी वाढ झाली. यासोबतच कांदा 46 टक्क्यांनी वाढला. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये गरमी खूप वाढलीय. याचा टोमॅटोच्या रोपांवर परिणाम होतोय. तांदळाच्या किंमतीत 13 टक्क्यांनी वाढ झालीय. यामुळे शाकाहारी थाळी तयार करण्याच्या खर्चात वाढ झालीय. 

नॉन व्हेज थाली झाली स्वस्त 

गेल्या काही दिवसांपासून नॉन व्हेज खाणाऱ्यांची मजा आहे. कारण प्रत्येक ब्रॉयलर चिकनची किंमत कमी होताना दिसतेय. तसेच अंडेदेखील स्वस्त झालंय. वर्षभराचा डेटा पाहिला तर जून महिन्यात चिकनचे दर 14 टक्क्यांनी कमी झालेयत. यासाठी मे महिन्यात चिकने दर 16 टक्क्यांनी स्वस्त झाले होते. गेल्या आर्थिक वर्षात चिकन खूप महागलं होतं. यावर्षी त्याच्या किंमतीत सलग घट होताना दिसतेय. 

महिन्यांचा विचार केला कर व्हेज आणि नॉन व्हेज थाली दोन्ही महाग झाल्यायत. व्हेज थाली 6 टक्क्यांनी तर नॉन व्हेज थाली 4 टक्क्यांनी महाग झाली. या महिन्यात शाकाहारी ताटात महत्वपूर्ण असलेल्या तांदूळ महाग झाला. भाज्या आणि डाळींचा उपयोगही दोन्ही ताटांमध्ये होतो. टोमॅटो आणि कांद्याचा उपयोगही शाकाहारी-मांसाहारी अशा दोन्ही ताटात होतो. गेल्या एक महिन्याच्या तुलनेत कांदा 15 टक्क्यांनी तर टोमॅटो 29 टक्क्यांनी महाग झालाय.