Viral | अमेरिकी लोकांनी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लं 'हाजमोला'; नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल

 हाजमोला प्रत्येक भारतीयाने कधीना कधी खाल्ली असेल. कोणी जेवण झाल्यानंतर हाजमोला खातात तर कोणी तोंडाची चव बदलवण्यासाठी खातात.

Updated: Jul 26, 2021, 08:23 AM IST
Viral | अमेरिकी लोकांनी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लं 'हाजमोला'; नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल

नवी दिल्ली : हाजमोला प्रत्येक भारतीयाने कधीना कधी खाल्ली असेल. कोणी जेवण झाल्यानंतर हाजमोला खातात तर कोणी तोंडाची चव बदलवण्यासाठी खातात. भारतीयांमध्ये हाजमोलाची पसंती भरपूर आहे. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का? की अमेरिकी लोकांनी हाजमोला खाल्ल्यावर त्यांचे रिऍक्शन काय असेल.

व्हिडिओ झाला वायरल
एका युट्यूब चॅनेलने हा कारनामा केला आहे. त्यांने काही अमेरिकी लोकांना पहिल्यांदा हाजमोला खाऊ घातला आहे. त्याची रिऍक्शन पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.

Our Stupid Reactions चॅनेलने 4 जुलै रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये Rick Segall आणि Korbin Miles होस्ट आहेत. या शोमध्ये रिकची आईसुद्धा सहभागी होती. त्यांनी हाजमोला खाल्यानंतर भन्नाट रिऍक्शन दिली आहे. यामुळे तुम्हालाही हसू येईल.

होस्टने एका मित्राला हाजमोला खाऊ घातल्यानंतर त्याने चक्क पाणी पिले.