काश्मीरच्या थंडीत भारतीय जवानांचा 'kala chashma' गाण्यावर तुफान डान्स परफॉर्मन्स Video Viral

Viral Video: काश्मीरमध्ये एवढ्या प्रचंड थंडीत भारतीय जवान सीमेचं रक्षण करतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून मायनस टेम्परेचरमध्ये  दिवरात्र डोळ्यात तेल घालून ते दुश्मनांना आपल्या हद्दीत येण्यापासून रोखत असतात. 

Updated: Nov 12, 2022, 10:36 PM IST
काश्मीरच्या थंडीत भारतीय जवानांचा 'kala chashma' गाण्यावर तुफान डान्स परफॉर्मन्स Video Viral  title=

Indian Army Jawans Dance on Kala Chashma Song Viral Video : काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात (kashmir heaven on earth) . काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. हिवाळ्यात इथल सौंदर्य सगळ्या जगाला भुरळ घालत. जो कोणी काश्मीरला जातो तो नयनरम्य वातावरणात हरवून जातो . पण यावेळी काश्मीर च्या सौंदर्यासोबत आणखी एका गोष्टीची बरीच चर्चा आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या तोंडून वाह वाह असच कौतुक होत आहे. (viral army soldiers in kashmir made reel on kala chashma song goes viral )

आतापर्यंत हा व्हिडीओ बऱ्याच जणांनी पहिला आहे. या व्हिडिओवर बऱ्याच कॉमेंट्स आता येऊ लागल्या आहेत. हा सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय लष्कराचे जवान आनंदाने नाचताना दिसत आहेत. 

काश्मीरमध्ये एवढ्या प्रचंड थंडीत भारतीय जवान सीमेचं रक्षण करतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून मायनस टेम्परेचरमध्ये  दिवरात्र डोळ्यात तेल घालून ते दुश्मनांना आपल्या हद्दीत येण्यापासून रोखत असतात. 

सध्या आपण पाहतोय रील बनवणं खूप फेमस झालं आहे. एखाद गाणं किंवा त्यावरच्या स्टेप्स ट्रेंड (instagram trend reels) होतात आणि मग युजर्स त्याप्रमाणे कॉपी करून रील बनवून ते पोस्ट करतात. (viral army soldiers in kashmir made reel on kala chashma song goes viral )

सध्या या रील्सची जादू भारतीय जवानांवर सुद्धा पडली आहे. नुकतेच जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात भारतीय जावं अशाच एका ट्रेंडिंग ''कला चष्मा'' या गाण्यावर रीळ बनवत नाचताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. सर्वजण जवानांचा कौतुक करत आहे.