लग्नाची इतकी घाई की घागराही घालायला विसरली? अशा अवस्थेत बाहेर आले की सगळे पाहातच राहिले...

लग्नाचा मुहूर्त चुकू नये म्हणून कपडे अर्धवट सोडून आली? वधूची ही फॅशन पाहून तुम्ही काय म्हणाल? पाहा व्हिडीओ

Updated: Dec 9, 2021, 08:10 PM IST
लग्नाची इतकी घाई की घागराही घालायला विसरली? अशा अवस्थेत बाहेर आले की सगळे पाहातच राहिले...

नवी दिल्ली: लग्न सोहळा म्हटलं की नववधून कशी छान सजून नटून थटून तयार होते. नववधूला पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. साडी लेहंग्याच्या फॅशननंतर आता एक अजब फॅशन आली आहे. जिन्सवर लग्नमंडपात नववधू जात असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

आतापर्यंत असे प्रकार हे टीव्हीवर किंवा सिनेमात झाल्याचं पाहिलं असेल. पण ही घटना प्रत्यक्षात घडल्य़ाचं सांगितलं जात आहे. नववधून फाटकी स्टायलिश जिन्स घातली आहे. त्यावर ब्लाऊज आणि ओढणी घेत ही स्टाइल असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओवर अनेक भन्नाट कमेंट्स येत आहेत. एका युजरने तर मस्करी करते की लग्न? असा उलट प्रश्न विचारला आहे.  Witty Wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 65 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

हल्ली लग्न सोहळ्यात नववारी साडी किंवा सहावारी साडीपेक्षा लेहंगा घालण्याकडे जास्त कल असल्याचं दिसत आहे. मात्र यामध्येही अशा प्रकारची होणारी फॅशन ज्याला फॅशन म्हणावं की नाही असाही एक प्रश्नच आहे. कारण लग्न सोहळ्यात अशा प्रकारे नववधूनं तयार होणं हे काही युझर्सना खटकल्याचंही दिसत आहे. 

हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तास या व्हायरल व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.