मतदान केलं नाही तर खात्यातून कापले जाणार 350 रुपये!; जाणून घ्या सत्य

मतदान केले नाही तर कापले जाणार पैसे?

Updated: Sep 17, 2022, 03:12 PM IST
मतदान केलं नाही तर खात्यातून कापले जाणार 350 रुपये!; जाणून घ्या सत्य title=

सोशल मीडियाच्या या युगात कोणत्याही प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं खूपच सोपे झालं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खोटी माहितीही सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच नुकतीच एक बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

लोकसभा निवडणुकीत (lok sabha election 2024) जो कोणी मतदान (Voting) करणार नाही, त्याच्या खात्यातून 350 रुपये कापले जातील, अशी बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवडणुकीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. पण मतदान न केल्याबद्दल पैसे कापले जातील, असे या व्हायरल बातमीमध्ये सांगण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर वृत्तपत्रातील एक बातमी व्हायरल (Viral News) होत आहे. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने या लोकसभा निवडणुकीत मतदान केले नाही तर त्याच्या बँकेच्या खात्यातून (Bank Account) 350 रुपये कापले जातील, असं म्हटलं आहे.

जाणून घ्या सत्य
 जेव्हा पीआयबीने (PIB) या व्हायरल बातमीची सत्यता तपासली तेव्हा ती खोटी बातमी असल्याचे समोर आलं आहे. PIB ने या बातमधील सर्व दावे खोटे असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही  पीआयबीने म्हटलं आहे. 

PIB ने लोकांना अशा बातम्या अजिबात शेअर करू नका असे सांगितले. यानंतर निवडणूक आयोगाने एका ट्विटमध्ये ही बातमी फेक असल्याचे म्हटले आहे आणि लोकांना अशा बातम्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

2019 मध्येही झाला होता व्हायरल

निवडणूक आयोगाने असेही सांगितले की 2019 मध्ये व्हायरल होत असलेल्या खोट्या बातम्या पुन्हा काही व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बातम्यांमध्ये केलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत.