लग्नात असं काही करण्याचा विचार करत असाल तर तोंडावर पडाल! पाहा व्हिडीओ

तुम्ही देखील तुमच्या जोडीदारासोबत लग्नात ग्रॅण्ड एन्ट्री करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ पाहा

Updated: Nov 30, 2021, 09:17 PM IST
लग्नात असं काही करण्याचा विचार करत असाल तर तोंडावर पडाल! पाहा व्हिडीओ

मुंबई: सध्या नुसतं सोशल मीडिया उघडलं तर आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे किंवा मित्र-मैत्रीणींच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर दिसतात. लग्नातील काही गमतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. या सगळ्यात सध्या चर्चा आहे ती एक व्हिडीओची. या व्हिडीओमध्ये चक्क नवरदेव आणि नववधू जेसीबी मशीनच्या वरच्या बाजूला बसले आहेत.

नववधू आणि नवरदेव दोघंही जेसीबी मशीनच्या वरच्या भागावर बसून मजा करताना दिसत आहेत. मात्र अचानक या दोघांसोबत दुर्घटना घडते. या दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांनाही हसू येतं. हे दोघंही जेसीबीवर बसलेले असताना वरून जोरात खाली कोसळतात. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नवरदेव आणि नववधू दोघंही खाली कोसळल्यानंतर सर्वजण ही फजिती झाली म्हणून हसू लागतात. हा व्हिडीओ कुठला आहे याची कोणतीही माहिती सध्या मिळू शकली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 

तुम्ही देखील लग्नात असा ग्रॅण्ड एन्ट्री करण्याचा विचार करत असाल तर थांबा. हा कपलसोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. त्यामुळे तुम्ही तोंडावर पडण्याची शक्यता आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 7 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. 298 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.