जॅग्वारकडून विशालयकाय मगरीवर हल्ला, नक्की शिकारीच्या खेळात कोण जिंकलं? पाहा व्हिडीओ

जॅग्वार आणि मगर यांच्यातील शिकारीचा थरार... पाहा कोण जिंकणार?

Updated: Nov 27, 2021, 02:33 PM IST
जॅग्वारकडून विशालयकाय मगरीवर हल्ला, नक्की शिकारीच्या खेळात कोण जिंकलं? पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली: बिबट्या असो किंवा चिता शिकारीचा खेळ पाहण्याचा थरार काही वेगळाच असतो. काही दिवसांपूर्वी बिबट्या मगरीची शिकार करण्यासाठी आला असताना मगरीनंच त्याला फस्त केलं. असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता चक्क पुन्हा एकदा शिकारीचा थरार दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जंगलात आपलं वर्चस्व गाजवणारा जॅग्वार आणि पाण्यात आपली सत्ता गाजवणारी मगर जेव्हा भिडतात तेव्हा कोण जिंकतं? याची उत्सुकता असते. जॅग्वारने मगरीची शिकार करण्याचा विचार करून तिच्यावर पाण्यात हल्ला केला. 

जॅग्वारने मगरीवर पूर्ण शक्तीने हल्ला केला. मगरही तरबेज निघाली. या मगरीनंही आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटरवर शेअर केला आहे.