तो करिअर करण्यासाठी दुबईत गेला.... पण असं काय घडलं की, त्याला नोकरी सोडून लग्न करावं लागलं

गोपालगंजच्या खजुरहां गांव येथे राहाणाऱ्या या तरुणाचे नाव आनंद कुमार आहे.

Updated: Jun 23, 2021, 07:38 AM IST
तो करिअर करण्यासाठी दुबईत गेला.... पण असं काय घडलं की, त्याला नोकरी सोडून लग्न करावं लागलं

यूपी (गोपालगंज) : आजकालच्या युगात सगळेच प्रेम करणारे जोडपे एकमेकांना लग्न करण्याचे वचन देतात. परंतु त्यापैकी खूप कमीच लोकं त्यांचे वचन पूर्ण करतात. आज काल लोकं, लग्नाचे वचन एकाला देतात आणि लग्न वेगळ्याच व्यक्ती बरोबर करतात. परंतू अजूनही काही लोकं असे आहेत, जे आपल्या प्रेमासाठी एकनिष्ठ असतात. असेच एक उदाहरण युपीमधील गोपालगंज भागातून समोर आले आहे. इथे एक प्रियकर चक्कं आपली दुबईची चांगल्या पगाराची नोकरी आणि आपले करिअर सोडून लग्न करण्यासाठी भारतात आला.

गोपालगंजच्या खजुरहां गांव येथे राहाणाऱ्या या तरुणाचे नाव आनंद कुमार आहे. त्याच्या बहिणीचे लग्न इमलीया गावात झाले.  आनंद त्याच्या बहिणीच्या घरी कामानिमीत्त यायचा, त्यादरम्यान गावातील संजनासोबत त्याचं प्रेम जमलं.

काही दिवसांनी आनंदला दुबईमध्ये नोकरी मिळाली. दुबईला नोकरी मिळाल्यामुळे आनंदला दुबईला कामासाठी जावं लागलं. परंतु त्याने दुबईला जाण्याआधी संजनाला लवकरच परत येऊन तुझ्या सोबत लग्न करेन, असे आश्वासन दिले आणि तो निघून गेला.

परंतु नंतर आनंद आणि संजनाचं प्रेम असल्याचं संजनाच्या घरच्यांना समजताच त्यांनी संजनासाठी मुलं पाहाण्यासाठी सुरवात केली. सांजनाने हे सगळ आनंदला कळवले. त्यानंतर आनंद क्षण भर देखील तेथे न थांबता आपली नोकरी सोडून संजनाकडे आला.

भोरे गावात आल्यानंतर आनंदने सरळ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडून मदत मागितली. पोलिसांनी ते दोघे ही बालिक असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांच्या ही घरच्यांना बोलावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर जवळच्या मंदिरात दोघांचे लग्न पार पडले.

पोलिसांच्या आणि दोघांच्या घरच्यांच्या उपस्थितीत त्या दोघ्यांचे लग्न झाले. ज्यामुळे हे दोघे ही प्रेमी खूप आनंदी आहेत.