"शॉक बडी चीज है", प्रसिद्धीसाठी रॅपरने उचलं जोखमीचं पाऊल, गळ्यात नाही तर इथे लटकवल्या सोन्याच्या चेन

सध्या एक सिंगर असाच त्याच्या विचित्र लूकसाठी चर्चेत आलेला आहे. 

Updated: Sep 12, 2021, 06:50 PM IST
"शॉक बडी चीज है", प्रसिद्धीसाठी रॅपरने उचलं जोखमीचं पाऊल, गळ्यात नाही तर इथे लटकवल्या सोन्याच्या चेन title=

मुंबई : सोशल मीडिया हा अस एक प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरती लोक काही ना काही व्हिडीओ शेअर करत असतात. यांपैकी काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोतोरात प्रसिद्धी मिळाली आहे. सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जेथे लोकांचा त्यांच्यामधील टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक वाटेलत्या थराला जातात आणि काहीतरी विचित्रच करुन बसतात.

सध्या एक सिंगर असाच त्याच्या विचित्र लूकसाठी चर्चेत आलेला आहे. हा सिंगर मॅक्सिकनचा रॅपर डॅन सुर त्याच्या विचित्र लाईस्टाइलमुळे चर्चेत आहे. त्याने त्याच्या नवीन लूकसाठी आपले केस कापले आहेत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतकं विशेष? हे तर सगळेच करतात. परंतु खरी गंम्मत तर पुढे आहे. ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल.

कारण या रॅपरने त्याच्या डोक्यावर केसांच्या जागी सोन्याच्या साखळ्या लावून घेतल्या आहेत. यासाठी त्याने खूप कठीण शस्त्रक्रिया देखील करुन घेतली आहे. त्यामुळे आता त्याच्या चेहऱ्याच्यासमोर सोन्याच्या साखळ्या लटकताना तुम्ही पाहू शकता. त्याच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन लुकसाठी सर्जिकल प्रक्रिया केली. त्याची शस्त्रक्रिया पूर्ण यशस्वी झाली. डेली मेलशी बोलताना रॅपर म्हणाला की, मला माझे केस रंगवायचे नव्हते. मी त्याच्या जागी काहीतरी नवीन करण्याचा विचार करत होतो, तेव्हाच ही कल्पना माझ्या मनात आली. यासाठी डॉक्टरांनी आधी सर्व केस काढले, नंतर त्याच्या जागी हुक लावला. या सगळ्या साखळ्या त्या हुकमध्ये लटकवलेल्या आहेत.

प्लॅस्टिक सर्जन डॉ फ्रँक अगुल्लो यांच्या मते, उच्च जोखमीची ही एक अतिशय असामान्य प्रक्रिया आहे आणि ते म्हणाले की, हे सुरक्षित नाही आणि त्यांनी चिंता व्यक्त केली आहे ते म्हणाले की, इतर लोक कदाचित प्रेरीत होऊन अशा पर्यायाचा विचार करू शकतील. परंतु लोकांनी याकडे लक्ष देऊ नये असे ही ते पुढे म्हणाले.

लोक सोशल मीडियावर लोक या लूकबद्दल बरीच चर्चा करत आहेत. काही लोक हे बरोबर आहे का असा प्रश्न विचारत आहेत? तर काही त्यांना विचारत आहेत की, तुम्ही तुमचे दात कसे स्वच्छ करता? लोकांना या रॅपरसंदर्भात वेगवेगळे प्रश्न पडले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रॅपरने म्हटले आहे की, हे त्याचे स्वतःचे जगातील पहिले प्रत्यारोपण आहे. ज्यामध्ये केसांच्या जागी साखळी लावण्यात आली आहे. त्याने त्याचे दात देखील सोनेरी रंगाचे केले आहेत. रॅपर डॅन सुर यांनी आशा व्यक्त केली आहे की, इतर लोक त्याच्या या कृत्यापासून प्रेरित होणार नाहीत. कारण केसांऐवजी सोन्याची साखळी ठेवणे खूप वेदनादायक असते. एवढेच काय तर त्यांना सांभाळणे खूपच जोखमीचे आणि मेहनतीचे काम आहे.