Social Media Reels : पत्नीचा रिल्स बनवण्याचा छंद एका पतीच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला रिल्स (Reels) बनवण्यापासून अनेकवेळा रोखलं. पण तीने पतीचं ऐकलं नाही. यावरुन पती-पत्नीमध्ये भांडणं वाढत गेली. दररोजच्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूआधी पतीने सोशल मीडियावर (Social Media) लाईव्ह करत पत्नीच्या व्हिडिओवर अश्लिल कमेंट करणाऱ्या युजर्सने उत्तर दिलं. तसंच रिल्सवरुन कुटुंबात चाललेल्या वादाचीही त्याने माहिती दिली.
काय आहे नेमकी घटना?
राजस्थानमधल्या अलवर इथली ही घटना आहे. इथल्य रैनी परिसरातील नांगलबास गावात राहाणारा सिद्धार्थ दौसा नावाचा तरुण सरकारी आरोग्य विभात लिपीक पदावर काम करता होता. दीड वर्षांपुर्वीच वडिलांच्या जागावेर अनुकंपातत्वावर त्याला नोकरी लागली होती. सिद्धार्थचं माया (Maya Meena) नावाच्या तरुशी लग्न झालं होतं. पण 5 एप्रिलला सिद्धार्थने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. 6 एप्रिलला सिद्धार्थच्या कुटुंबियांना पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
मायाला सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्याचा छंद जडला होता. वेगवेगेळ्या विषयांवर रिल्स बनवून ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकर शेअर करत असे. पण यावर काही युजर्सकडून अश्लिल कमेंट केल्या जात होत्या. पत्नीच्या रिल्सवर येणाऱ्या अश्लिल कमेंटमुळे पती सिद्धार्थ नाराजा होता. त्यामुळे त्याने मायाला रिल्स बनवण्यापासून रोखलं, पण मायाला रिल्सचं व्यसनच लागलं होतं. तीने सिद्धार्थच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. यावरुन दोघांमध्ये भांडणं वाढू लागली. सिद्धार्थ आणि मायाला तीन मुली आणि एक मुलगा आहे.
माया-सिद्धार्थमध्ये वाद वाढला
सिद्धार्थच्या सांगण्यानंतरही माया रिल्स बनवत होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढला. घरात दररोज भांडणं होऊ लागली. दररोजच्या भांडणाला कंटाळून माया मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. इतकंच नाही तर तीने सिद्धार्थविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली. सिद्धार्थला दारु पिण्याचं व्यसन असल्याचं तीने तक्रारीन म्हटलं.
सिद्धार्थने लाईव्ह करत दिलं उत्तर
पत्नी मायाच्या रिल्स आणि तीने केलेल्या आरोपांमुळे सिद्धार्थ नैराश्यात गेला. त्याने टोकाचं पाऊल उचललण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी त्याने सोशल मीडियावर लाईव्ह येत पत्नीच्या रिल्सवर अश्लील कमेंट करणाऱ्या युजर्सना उत्तर दिलं. या व्हिडिओत त्याने म्हटलंय 'मायाने माझ्या भावावर खोटे आरोप केले. माझ्या सोशल मीडिया अकाऊंटचा आयडी आणि माझ्या नावावरच सिम कोर्ड सासरच्या लोकांकडे आहे. माझ्या मृत्यूला पत्नी माया जबाबदार आहे. मी स्वत: कधीच रिल्स बनवले नाहीत'
सिद्धार्थाचा मृत्यूपूर्वीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिद्धार्थने केलेल्या आरोपांबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पण पोलिसांच्या तपासात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आपण कधीच रिल्स बनवले नाहीत असा आरोप करणाऱा सिद्धार्थ पत्नी मायाच्या अनेक व्हिडिओत सहभागी व्हायचा. त्यामुळे सिद्धार्थच्या मृत्यूचं नेमंक कारण काय आहे यावर पोलीस तपास करत आहेत. मायाच्या रिल्सवर ज्या युजर्सने अश्लिल कमेंट केल्या आहेत, त्या युजर्सचीही चौकशी केली जाणार आहे.