चक्क विमानाच्या खिडकीवर गुटख्याची पिचकारी, लोकं म्हणतायत 'जुबां केसरी'

IAS अधिकाऱ्याने ट्विट केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत  

Updated: May 26, 2022, 10:34 PM IST
चक्क विमानाच्या खिडकीवर गुटख्याची पिचकारी, लोकं म्हणतायत 'जुबां केसरी' title=

Viral News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावं आणि शहरं स्वच्छ ठेवण्यासाठी 'स्वच्छ भारत अभियान' सुरू केलं होतं. 'एक पाऊल स्वच्छतेकडे' हे वाक्य देशातील सर्वसामान्यांसाठी पोहचवण्यासाठी अभियान राबवलं गेलं. अशाच सध्या एक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

हा फोटो पाहून सार्वजनिक स्वच्छतेला लोकं किती हलक्यात घेतात याचाच प्रत्यय येतो.  IAS अधिकारी अवनीश शरण यांनी हा फोटो ट्विट केला आहे, ज्यावर खूप मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

IAS अवनीश शरण यांनी विमानातील खिडकीच्या सीटचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. पण हा फोटो सामान्य नाहीए. चक्क विमानाच्या खिडकीवर कोणीतरी गुटख्याची पिचकारी मारलेली या फोटोत दिसत आहे. फोटो शेअर करताना शरण म्हणतात, 'कोणीतरी आपली ओळख मागे सोडली आहे'

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर यूजर्सकडूनही वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. आयएएस अधिकाऱ्याच्या या पोस्टवर 11 हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. आयएएसच्या या फोटोला उत्तर देताना आयपीएस सूरज सिंह परिहार यांनी लिहिलंय 'आपला परंपरा, संस्कृती आणि पालनपोषण असं कोण मागे सोडतं?

या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले ज्याने हे कृत्य केलं आहे, त्याला मोठा आर्थिक दंड ठोठावला पाहिजे.

काही लोकांनी चित्रपटातील सुपरस्टार्सला यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. सुपरस्टार्सकडून तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहीराती केल्या जात असल्याने असे प्रकार घडत असल्याची टीकाही होत आहे.

आयएएस अधिकारी अवनीश शरण ट्विटरवर खूप सक्रिय असतात. यापूर्वी, त्यांनी कोलकात्याच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये संपूर्ण पिलर तंबाखू आणि सुपारीच्या पानांनी माखलेला दिसत होता. अवनीश शरणने हा फोटो शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनाही टॅग केला होता.