Fack Chek : चहा प्याल तर बुटके व्हाल? तुमचीही दिवसाची सुरुवात चहाने होते... मग ही बातमी वाचाच

भारतात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच चहा आवडतो, चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, पण याच चहामुळे तुमच्या उंचीवर परिणाम होऊ शकतो?

Updated: Feb 16, 2023, 02:53 PM IST
Fack Chek : चहा प्याल तर बुटके व्हाल? तुमचीही दिवसाची सुरुवात चहाने होते... मग ही बातमी वाचाच title=

Viral News : आपल्या मुलांची चांगली उंची (Hight) असावी अशी आपल्या आई-वडिलांची इच्छा असते...मात्र, मुलं चहा (Tea) जास्त प्रमाणात पित असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या...कारण, चहा प्यायल्याने उंची खुंटते असा दावा करण्यात आलाय...हा दावा केल्यानं तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झालाय...खरंच असं होऊ शकतं का...? याची पडताळणी करून सत्यता सांगणं गरजेचं आहे...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

काय आहे व्हायरल मेसेज
अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने नुकसान होतं. कॅल्शियमचं (calcium) प्रमाण कमी होतं.यामुळे तरुणांची उंची वाढत नाही. हा दावा केल्यानं आमच्या व्हायरल पोलखोल (Viral Polkhol) टीमनं पडताळणी सुरू केली. मुलांची उंची वाढणं हे त्यांच्या अनुवांशिकत्वेवर (Genetics) अवलंबून असतं, योग्य आहार, योग्य व्यायाम यावरही मुलांची उंची वाढण्याशी संबंध असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात...
चहा प्यायल्यानं मुलांच्या उंचीवर परिणाम होतो हे सिद्ध झालेलं नाही


उंची किती वाढेल यामागे मुलांचे अनुवंशिकता, आहार अवलंबून असतं


चहाचा परिणाम उंचीवर होतो हे सांगणं कठीण


भारतात लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच चहाचं सेवन करतात 


मात्र चहामुळे उंची वाढत नसल्याचं कुठेही आढळलेलं नाही

त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला...असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते...त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका.