'वडिलांना दोन लाखांना विकतोय'; दाराबाहेर लावलेल्या 'या' नोटीसमुळे शेजारी हैराण

Viral son notice to sell father news: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल पोस्टची. ही पोस्ट वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वडिलांसाठी मुलानं जे लिहिलंय ते वाचून तुमचे डोळे मोठे होतीलच पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Updated: Oct 5, 2023, 10:06 PM IST
'वडिलांना दोन लाखांना विकतोय'; दाराबाहेर लावलेल्या 'या' नोटीसमुळे शेजारी हैराण  title=
viral post of son selling father for 2 lakhs news in marathi

Viral son notice to sell father news: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. सध्या अशाच एका पोस्टची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. तुम्हाला माहितीये का की हा फोटो आहे तरी काय? यावेळी या फोटोची बरीच चर्चा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले परंतु यावेळी एका लहान मुलानं जे काही लिहिलंय ते वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यावेळी त्यामुळे या मुलाची जोरात चर्चा आहे. लहान मुलांचे विश्व हे फारच वेगळं असते. त्यांच्या जगात वेगवेगळ्या गोष्टी या घडत असतात. त्यामुळे त्यांच्या करामती या सोशल मीडियावर व्हायरल होयला फार काहीच वेळ लागत नाही. सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्येही काहीसं असंच आहे. तुम्हाला माहितीये का की लहान मुलांच्या गुणपत्रिका या अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यातून त्यात लिहिला आशय पाहून तर भल्याभल्यांची झोप उडते. सध्या असाच काहीसा प्रकार घडला आहे. 

सध्या व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये एका मुलाची करामत पाहायला मिळते आहे. यावेळी चक्क त्यानं आपल्या वडिलांनाच विकायला काढलं आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. X वर (पुर्वीचं ट्विटर) एका अकांऊटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. @Malavtweets वरून हे ट्विट शेअर करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. दाराच्या बाहेर आपण विविध प्रकारचे बोर्ड पाहतो ज्यावर नाना तऱ्हेच्या गोष्टी या लिहिल्या असतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. त्यातून पुण्याच्या पुणेरी पाट्याही लोकांचे लक्ष वेधून घेतात. यावेळी व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये एका दारासमोर एक बोर्ड दिसतो आहे. 

हेही वाचा : शेफाली शहानं पाहिलं मराठी नाटकं; मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल पाहा काय म्हणाली...

या नोटीसमध्ये असं लिहिलंय की, मी माझ्या वडिलांना दोन लाखांना विकतोय. अजून माहिती हवी असेल तर संपर्क साधावा. सध्या ही पोस्ट चांगली व्हायरल होते आहे. या पोस्टच्या कॅप्शननुसार, ही पोस्ट एका 8 वर्षाच्या मुलानं लिहिली आहे. सोबतच त्यानं यावेळी लिहिलंय की त्याची त्याच्या वडिलांसोबत काहीतरी नाराजी असावी.

या पोस्टखालीही नानाविध कमेंट्स आल्या आहेत. सध्या या पोस्टनं सगळ्यांच्याच नजरा वळवल्या आहेत. परंतु यावरून पुन्हा एकदा बालक आणि पालक यांच्यातला संवाद कुठे कमी होतोय का याचीही चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे यावरून हा प्रश्नही उपस्थित होतो आहे.