Video : मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनियर्सचं कपडे काढून...भयावह दृश्य

Medical Students Suspended :  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता फ्रेशर्स तरुण अंडरवेअरमध्ये कॉलेज परिसरात सैरवैर पळताना...

Updated: Nov 10, 2022, 12:36 PM IST
Video : मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनियर्सचं कपडे काढून...भयावह दृश्य title=
viral shocking ragging video mbbs students nmp

Students Ragging Video Viral :  रॅगिंगच्या (Ragging) विरुद्धात अनेक वेळा सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाना यापूर्वी निर्देश दिले आहे. देशात रॅगिंग हा मोठा गुन्हा मानला गेला आहे. महाराष्ट्रात तर 20 वर्षांपूर्वी कायदा करण्यात आला आहे. मात्र आजही व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेत रॅगिंगच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एका मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगचा व्हिडीओ (medical college ragging Video ) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on social media) होतो आहे. रॅगिंगच्या भीषण घटनेनंतर देश हादरला आहे. 

भयावह दृश्य 

Shocking Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो आणि संतापही...या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता फ्रेशर्स (Freshers) तरुण अंडरवेअरमध्ये कॉलेज परिसरात सैरवैर पळताना दिसतं आहेत. तर काही विद्यार्थी फायर हायड्रंट्समधून त्यांच्यावर पाण्याची फवारणी करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांना चिखलात लोळण्यास सांगितलं...रॅगिंगचा हा प्रकार इथेच थांबत नाही, तर या विद्यार्थ्यांना सहकारी विद्यार्थ्यांसोबत आणि जमिनीसोबत अश्लिल कृत्य करण्यास सांगितलं जातं. हा व्हिडीओ पाहताना तुमचा राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये दिसतं आहे की, सिनियर विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांच्या प्रायव्हेट पार्टवरही (Private part) मारत आहेत.  (viral shocking ragging video mbbs students nmp)

हे रॅगिंग नाही ही तर स्पर्धा...

हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आला आहे. तर महाविद्यालयात ज्युनियर मिस्टर मेन्स हॉस्टेल अशी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र का ज्युनियर विद्यार्थ्याने माध्यमांना सांगितलं की, त्यांच्यासोबत शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. 

कुठे घडला हा प्रकार ?

चेन्नईतील वेल्लारेच्या प्रख्यात ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील ( Christian Medical College, Vellore) हा धक्कादायक प्रकार आहे. एदरम्यान एका डॉक्टरने एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची पोस्ट ट्विट केली आणि ती व्हायरल झाली. त्यानंतर व्यवस्थापनाने 7 सिनियर एमबीबीएस विद्यार्थ्यांना निलंबित (suspends 7 final year mbbs students) केलं.