Student Funny Answer Sheet Viral: हल्ली तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल (Viral Student Funny Homework) होताना दिसतात. त्यातून लहान मुलांचे अनेक कॉमेडी व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. लहान मुलांच्या गुणपत्रिका तर त्यातूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आपलं हसू आवरता येणं मुश्किल झालं आहे. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्याला लिहायला (Viral Video of Student) सांगितले एक आणि या पठ्ठ्यानं लिहिले काहीतरी भलतेच. त्यातून एकच हशा पिकला आहे.
तुम्ही हा व्हिडीओ मिस केला असेल तर अजिबात चुकवू नका कारण हा व्हिडीओ पाहून तुमचेही हसून हसून पोट दुखल्याशिवाय राहणार नाही. या मुलाला हॉमवर्कमध्ये एक साधा प्रश्न विचारला होता परंतु हा त्याचे उत्तर योग्य रीतीनं देऊ शकला नाही. त्याऊलट त्याने जे काही लिहून ठेवले त्यानं दोन मिनिटं शिक्षकांनाच काही सुचले नसेल. शिक्षकांप्रमाणे नेटकऱ्यांचीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे, त्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. (viral video a student writes funny answers in home work ka se kabutar trending news in marathi)
तुम्हाला लहानपणी अक्षरांवरून शब्द लिहियला शिकला असालच. आधी आपल्याला अक्षरओळख शिकवली जाते आणि मग त्यावरून म्हणजे तो अक्षर सुरूवातीला अशाप्रकारे शब्द कसे लिहावेत हे शिकवले जाते. आपण शाळेत नीट लक्ष दिले तर आपल्याला त्याची उत्तरं योग्य प्रकारे लिहिणे सोप्पे जाते परंतु एका विद्यार्थ्यांनं मात्र पुरती हद्दच पार केली आहे. त्यातून हे लिहिलेले शब्द वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
आपले पालक आणि शिक्षक मुलांच्या बौद्धिक विकासावर आवर्जून लक्ष देत असतात परंतु सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून मात्र काही पालक आणि शिक्षक मात्र टेंशनमध्ये आले आहेत. या मुलाला 'क' वरून कबूतर तर बाकीच्या अक्षरांवरून काय असा प्रश्न विचारला असता त्यानं 'क' वरून कबूतरप्रमाणे 'ग' वरून गबूतर, 'घ' वरून घबूतर, 'ख' वरून खबूतर असे 'ठ' पर्यंत शब्द लिहिले आहेत. मात्र त्याला 'ड' आणि 'त्र' वरून काहीच शब्द सुचले नाहीत.
सध्या लहान मुलाचा हा प्रकार वाचून शिक्षकांना आणि पालकांना हसू तर आवरता आले नाही परंतु त्यांचे टेंशन अजूनच वाढले आहे आणि शिक्षकांनी शून्य मार्क दिले आहेत. हा व्हिडीओ @i_am_naval_kishor_kushwah या एका यूझरनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे.