हात चलाखी करत आंटीकडून ग्राहकांची फसवणूक, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, 'पुढच्या वेळी सामान नीट बघून खरेदी करावा लागेल'

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सतर्क राहाल आणि पुढच्यावेळी बाजारातून काहीही विकत घेताना विशेष काळजी घ्याल.

Updated: Sep 22, 2021, 12:56 PM IST
हात चलाखी करत आंटीकडून ग्राहकांची फसवणूक, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, 'पुढच्या वेळी सामान नीट बघून खरेदी करावा लागेल'

मुंबई : आपण जेव्हाही बाजारात जातो तेव्हा फळे किंवा भाजी घेताना आपण सगळ्या गोष्टी निवडून घेतो, कारण आपण त्यांना पैसे देणार असतो. त्यामुळे आपण मोठ्या चतुराईने सगळ्यागोष्टी विकत घेतो. परंतु अनेक वेळा दुकानदार देखील इतके हुशार निघतता की, आपण कितीही डोळ्यात तेल टाकून भाज्या किंवा फळे निवडले तरी ते आपल्याला फसवू शकतात. अशाच एका दुकानदाराच्या हुशारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सतर्क राहाल आणि पुढच्यावेळी बाजारातून काहीही विकत घेताना विशेष काळजी घ्याल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काकू रस्त्याच्या कडेला फळे विकत आहे. ग्राहक तिच्या गाडीवरुन फळे विकत घेताना ते निवडून घेतात आणि एका सफेद रंगाच्या पिशवीत टाकून त्या काकूकडे वजन करायला देत आहेत.

परंतु ती काकू इतकी हुशार आहे की, ती आपल्या हात सफाईन ग्राहकाने निवडलेल्या फळांची पिशवी बदलते आणि त्याच्याबदली तिच्या पुढ्यातील पिशवी हातात घेते. या महिलेने हे काम इतक्या चतुराईने केले की, जवळ उभ्या असलेल्या अनेकांना देखील तिची ही हात चलाखी लक्षात येत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि लोकं कमेंट्स करुन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने सांगितले, 'आंटीने तिचे काम इतके चतुराईने केले की, लोकांना याबद्दल समजले देखील नाही. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने सांगितले की, 'पुढच्या वेळी मी कोणतीही वस्तू खरेदी करताना दुकानदारावर नजर ठेवीन. अनेक यूजर्सनी यावर मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बातमी लिहीपर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. यासह, बरेच लोक या व्हिडीओला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करत आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती मिळेल आणि त्यांची फसवणूक रोखली जाईल.