Viral Video: वऱ्हाड्यांसमोर वधू वराची नामुष्की! अचानक नको 'तो' व्हिडिओ लागला अन् मग...

Bride Groom Viral Video: भरमंडपात सगळीकडे आनंदाचं वातावरण, नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पण अचानक स्क्रीनवर त्यांचा प्रॉव्हेट व्हिडीओ लागला अन् मग...  

नेहा चौधरी | Updated: May 12, 2023, 11:06 AM IST
Viral Video: वऱ्हाड्यांसमोर वधू वराची नामुष्की! अचानक नको 'तो' व्हिडिओ लागला अन् मग... title=
viral video bride groom kissing private video starts at wedding trending video on social media

Bride Groom Viral Video: गेल्या काही वर्षांपासून लग्न सोहळ्याची संकल्पनाच बदली आहे. लग्न हे नवरदेव आणि नवरीसोबतच त्या दोन कुटुंबाच्या मिलनाचा सोहळा असायचा. पांरपरिक पद्धतीने विधी करुन नवं जोडप्याला आशीवार्द देण्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळ येतात. पण गेल्या काही वर्षांपासून लग्न सोहळा हा लोकांना दाखविण्यासाठी, स्पर्धेतून आणि सोशल मीडियावर हिट मिळवण्यासाठी केला जातो का असा प्रश्न पडला आहे? 

लग्नापूर्वी वधू वराचे प्रीवेंडिंग शूट केलं जातं आणि ते लग्नाचा दिवशी मोठ्या स्क्रीनवर दाखवली जाते. भव्य दिव्य आणि हटके विवाहसोहळा कसा होणार याकडे नवरदेव नवरीपासून घरच्यांचा कल असतो. पण वऱ्हाड्यांसमोर वधू वरांचा तो प्रॉव्हेट क्षण अचानक लागल्यामुळे त्या दोघांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. (viral video bride groom kissing private video starts at wedding trending video on social media)

लग्नापूर्वीच्या या प्रीवेंडिंग फोटोशूटमध्ये होणाऱ्या नववधू वरांचे रोमाँटिक फोटो आणि व्हिडीओ काढले जातात. असाच छान रोमाँटिक फोटोशूट या जोडप्याचंही करण्यात आलं होतं. लग्न समारंभात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. वधू वराच्या चेहऱ्यावर आनंद ओसडूंन वाहत होता. पण काही क्षणात त्यांचा चेहऱ्यावरील आनंद मावळा आणि त्यांचे चेहरे पांढरे पडले. 

भरमंडपात स्क्रीनवर वधू वर एकमेकांना किसिंग करतानाचा तो प्रॉव्हेट क्षण प्ले झाला आणि नवरीची शरमेने मान खाली गेली.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांची वधू वरावर टीका केली आहे. प्री वेडिंग फोटोशूट म्हणजे चित्रपट आहे की, काय असंच काहीस चित्र दिसत आहे. 

हा व्हिडीओ digital_netkari या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वधूवर मिठी मारताना आणि किस करत आहेत. वधू वरामधील रोमान्सचा क्षण सगळ्यांसमोर लागल्यामुळे वधू वरांनी डोळेच बंद केले.  

गेल्या काही वर्षांपासून लग्नापूर्वी प्री वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड आला आहे. यामध्ये होणाऱ्या वधू वराचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ काढले जातात. हे शूट लग्नाच्या दिवशी समारंभात मोठ्या स्क्रीनवर लावलं जातं. लग्नात दोन्हीकडली लोक असतात. मामा मामी, आत्या काका, मावशी काका,  भाव बहिणी आणि लहान मुलं..त्यामुळे अशावेळी वधू वराचे असे किस आणि मिठी मारतानाचा क्षण यासगळ्यांसमोर सुरु होतात तेव्हा नववधूसाठी हा क्षण अतिशय लाजीरवाणा आणि अस्वस्थ करणारा असतो. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x