लग्नानंतर नातेवाईकांनी नवरीला हवेत उडवलं आणि... तिच्यासोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

लग्नात अशा काही विधी केल्या जातात, ज्याची आपल्याला कल्पना नसते.

Updated: Jan 5, 2022, 08:15 PM IST
लग्नानंतर नातेवाईकांनी नवरीला हवेत उडवलं आणि... तिच्यासोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : लग्न म्हटलं की मज्जा मस्ती ही येतेच. हा क्षण प्रत्येक नववधू आणि नवरदेवासाठी आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे त्यांचे मित्र-मैत्रीण आणि नातेवाईक देखील फार आनंद असतात. लग्नात अनेकदा असे क्षण घडतात, जे आपल्या नेहमी लक्षात राहातात. या एका लग्नात देखील नववधूसोबत असा प्रकार घडला जो ही नववधू कधीही विसरणार नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नात अशा काही विधी केल्या जातात, ज्याची आपल्याला कल्पना नसते. अशाच एका विधीदरम्यान नववधूसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. ज्यामुळे लग्नाशीसंबंधीत हा व्हिडीओ भलताच चर्चेत आला आहे.

हा व्हिडीओ एका ख्रिश्चन धर्मातील लग्नाचा आहे. यामध्ये विधीप्रमाणे लग्नानंतर नववधू आणि नवरदेवाला उचलून डान्स केला जातो. या विधीमध्ये वधू-वर आणि त्यांचे नातेवाईक फार मज्जा मस्ती करतात.

या व्हिडीओमध्ये देखील नववधूचे नातेवाईक तिला उचलून नाचत असतात, त्यादरम्यान ते नववधूला हवेत फेकतात. परंतु तेव्हा तिचे संतुलन बिघडते आणि ती सगळ्यांच्या हातातून निसटते. ती जमिनीवर पडणार इतक्यात बाजूला उभे असलेले लोकं तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतात.

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की, आता या नववधूचं काही खरं नाही ही डोक्यावर पडणार ज्यामुळे तिचे दात तरी तुटतील किंवा मान तरी लचकेल. परंतु नशीबाने लोकं तिला सावरतात. ज्यामुळे खुप मोठी घटना घडण्यापासून वाचते आणि नववधूला देखील काही होत नाही. नववधूला वाचवल्यानंतर नातेवाईक एक मोठा श्वास घेतात. त्यावेळाला मात्र तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून हसू आवरणार नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ प्रपोजलपेज नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एक युजर लिहितो, 'नशीब चांगलं होतं की ती वाचली.' तर दुसरा युजर लिहितो, 'देवाचे आभार की त्या माणसाने तिला वाचवले.’ तिसऱ्या युजरने लिहिले, 'तिची हेअरस्टाईल खूप छान आहे.'