बापरे!नागरी वस्तीत घुसली मगर, नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण; पाहा VIDEO

महाकाय मगरीची नागरी वस्तीत एन्ट्री, मगरीचा हा VIDEO पाहिलात का?

Bollywood Life | Updated: Aug 27, 2022, 09:33 PM IST
बापरे!नागरी वस्तीत घुसली मगर, नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण; पाहा VIDEO

प्रयागराज : पावसाळ्यात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकदा मगरी नागरी वस्तीत घुसल्याच्या घटना आपण ऐकल्या आणि पाहिल्या असतीलचं.अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. महाकाय मगर नागरी वस्तीत शिरल्याची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गंगेच्या पाण्याची पातळी वाढलीय. गंगा नदीच्या काठावरील तराई भाग पाण्याखाली गेला आहे. गंगेचे पाणी शहरातील रस्त्यांवर भरल्याने गंगा नदीत राहणारे जलचर प्राणीही रस्त्यावर आले आहेत. हे प्राणी हळूहळू नागरी वस्तीतही शिरत आहे. अशीच एक महाकाय मगर नागरी वस्तीत शिरली होती. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे.  

 
व्हिडिओत काय?
प्रयागराजमधील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या सलोरी आणि शुक्ला मार्केटमध्ये महाकाय मगर पाहिल्यावर लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.  होती.10-12 फूट लांबीची मगर पाहून लोक घाबरले होते आणि आपले दरवाजे बंद करून छतावर चढले होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, संपूर्ण रस्ता पाण्याने भरलेला आहे. रस्त्यावरील पाण्यात 10-12 फूट उंचीची मगर संथपणे पोहत आहे. लोक छतावरून व्हिडिओ बनवत होते. मगर या रस्त्यावरून त्या गल्लीत चालत राहिली. नागरी वस्तीत मगर शिरल्याचे पाहून नागरीकांना मोठा धक्का बसला होता. 

 

ऐकावे ते नवलचं! मेट्रोत थेट प्रवाशाची आंघोळ, VIDEO होतोय व्हायरल 

 

मगरीला पकडण्यात यश

या घटनेची माहिती तत्काळ पोलीस व वनविभागाला देण्यात आली होती. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या मगरीने अधिकाऱ्यांचा घाम फोडला होता. सुमारे 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मगरीला पकडण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आले आहे. यानंतर स्थानिक नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x