Flipkart चा बंपर सेल! Smartphone, TV, AC, Washing Machine वर 75% पर्यंत सूट

फ्लिपकार्टवर तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स पाहायला मिळतील. या वेबसाईटवर तुम्हाला धम्माल डील, कॉम्बो डील आणि अन्य ऑफर्सही पाहायला मिळतील

Updated: Aug 28, 2022, 02:41 AM IST
Flipkart चा बंपर सेल! Smartphone, TV, AC, Washing Machine वर 75% पर्यंत सूट title=

Flipkart Big savings: नवीन स्मार्टफोन (New Smartphone), टीव्ही (TV) , फ्रिज (Fridge), एसी (AC), वॉशिंग मशीन (Washing Machine) विकत घ्यायच्या विचारात आहात? तुमच्यासाठी आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण ईकॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्हाला विविध गोष्टींवर तगडा डिस्काऊंट देखील मिळतोय. इथून तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू तब्बल 75% डिस्काऊंटवर विकत घेऊ शकतात. जाणून घेऊयात नक्की काय आहेत या ऑफर्स.

Flipkart वर Big Bachat Dhamaal सेल सुरु झाला आहे. 26 ऑगस्टपासून सुरु झालेला हा सेल 28 ऑगस्टपर्यंत सुरु असणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला विविध प्रोडक्ट्स आकर्षित किमतीत मिळू शकतात. या सेलमधून तुम्ही टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशीन आणि अन्य गोष्टी तब्बल 75% डिस्काऊंटमध्ये विकत घेऊ शकतात. 
  
फ्लिपकार्टवर तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स पाहायला मिळतील. या वेबसाईटवर तुम्हाला धम्माल डील (Dhamal Deals) , कॉम्बो डील (Combo Deals)  आणि अन्य ऑफर्सही पाहायला मिळतील. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकतात.

Samsung, MI, Realme च्या 32 इंची टीव्हीच्या किमती 11,999 रुपयांपासून सुरु होतात. या सेलचा लाभ घेऊन तुम्ही वॉशिंग मशीन केवळ 6,490 रुपयांपासून विकत घेऊ शकतात. 

टीव्हीवर कोणत्या ऑफर्स ?

या सेलमध्ये Samsung, MI, VU आणि इतर टीव्ही ब्रॅंड्सच्या 4K व्हर्जनचे TV तुम्हाला 22,999 रुपयांपासून मिळू शकतात. TV ब्रॅंड्सवर तब्बल 65% डिस्काऊंट मिळू शकतो. 

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काऊंट 

या सेलच्या माध्यमातून तुम्ही एअर कुलर अवघ्या 2,999 तर टीव्ही 7,499 रुपयांपासून विकत घेऊ शकतात. घरगुती उपकरणं म्हणजेच होम अप्लायन्सेस यावरही तगडा 70% डिस्काऊंट आहे.

या सेलमधून तुम्ही अवघ्या 999 रुपयांपासून पंखे विकत घेऊ शकतात. किचन अप्लायन्सेस तुम्हाला अवघ्या 299 रुपयांना मिळू शकतात. AC वॉशिंग मशीनवरही तुम्हाला तगडा 55% आणि 60% अनुक्रमे डिस्काऊंट मिळू शकतो. 

flipkart Big Bachat Sale get 75 percent discount on TV AC Frigde washing machine