ऐकावे ते नवलचं! मेट्रोत थेट प्रवाशाची आंघोळ, VIDEO होतोय व्हायरल

मेट्रोत प्रवाशाची आंघोळ, पाणी दुसऱ्या प्रवाशांचा अंगावर पडताचं झाला राडा, VIDEO पाहिलात का? 

Updated: Aug 27, 2022, 09:34 PM IST
ऐकावे ते नवलचं! मेट्रोत थेट प्रवाशाची आंघोळ, VIDEO होतोय व्हायरल  title=

मुंबई : मेट्रोत आतापर्यंत अनेक विचित्र घटना घडल्या आहेत. या घटनेची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मेट्रोत गरबा डान्स केल्याच्या, ढोल वाजवल्याच्या त्याचबरोबर आंदोलन केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या घटनेत त्याहून विचित्र घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर संध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मेट्रोतला आहे. यामध्ये एक प्रवाशी थेट मेट्रोतच आंघोळ करताना दिसत आहे. हा व्यक्ती बाथ टब घेऊन मेट्रोत दाखल झाला होता. आणि बिनधास्तपणे आंघोळ करत होता. दरम्यान प्रवाशाच्या अशा वागण्याचा इतर प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. 

महाकाय मगरीची नागरी वस्तीत एन्ट्री, मगरीचा हा VIDEO पाहिलात का?

व्हिडिओमध्ये हा माणूस पिवळ्या बाथिंग टबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे, त्यानंतर तो मुद्दाम स्वत:वर अशा प्रकारे पाणी ओततो की तो एका प्रवाशावर पडतो. त्यामुळे प्रवासी वैतागला आणि त्याच्याशी भांडू लागला. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की आणि हातापाई सारखी घटना घडते. त्यानंतर या भांडणात इतर प्रवासी येत ते भांडण मिटवतात. अशी घटना या व्हिडिओत घडतेय. हा व्हिडिओ न्यूयॉर्क शहरातील असल्याचा दावा केला जात आहे.

@dailyinstavids नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 25 ऑगस्ट रोजी ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडिओ पाहून अनेकांना तो स्क्रिप्टेड असल्याचे वाटत आहे. ट्विटरवर आतापर्यंत या व्हिडिओला 36 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.