मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ सतत व्हायरल होत असतात. त्यात काही मजेशीर, धक्कादायक, माहितीपूर्ण, रोमांटिक, रेसिपी, प्राणी, लहान मुलांचे आणि डान्सचे व्हीडिओ असतात. यातील काही व्हीडिओ सोशल मीडियावर खूप गाजतात. काही व्हीडीओ बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. या वृद्ध सरदारजी जोडप्याचा डान्सचा व्हीडीओ तुम्ही सोशल मीडियावर बघितला असाल. त्यांचा डान्स पाहून अनेकाना आर्श्चय वाटतं. या वयात इतका सुंदर डान्स कसे करु शकता, प्रश्न पडतो.
त्यांचा हा डान्सचा व्हीडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. यंदा हा व्हिडीओ एका क्लबमधील आहे. असं म्हणतात संगीत सुरु झालं की हे सरदारजी जोडप डान्स करायलं लागतं. क्लबमध्ये संगीत सुरु झालं आणि संगीताच्या तालावर सरदार जोडपं थिरकायला लागलं.
क्लबमधील इतर लोकं त्यांचा डान्स पाहून अवाक् झाले. तुम्ही पण यांचा डान्स पाहतच राहाल. आठवले का तुम्हाला ते सरदारजी जोडपे...नाही, चला मग बघा त्यांचा नवीन डान्स व्हिडीओ.
What living life to the fullest looks like.. :)
Courtesy - @gitanasingh #Dancemoment #DanceWithMadhuri #OnlineDanceAcademy #dancevideo #dance #dancer #dancers #dancelife #dancing #choreography #dancersofinstagram #dancechallenge #dancelove #instadance #dancecover #music pic.twitter.com/oD2lVt3gUW
— DanceWithMadhuri (@dancewithMD) May 12, 2022
तुसी ग्रेट हो वाह क्या बात हैं...हा डान्स पाहून तुमच्याही तोंडून असंच काहीस कौतुकास्पद उद्गार नक्कीच निघणार. त्यांचा डान्स सुरु झाल्यावर क्लबमधील लोकांना टाळ्या वाजण्याचा मोह आवरता आला नाही.
काही सेकंदाचा हा व्हीडीओ सतत बघावासा वाटतो. असं म्हणतात की, कुठल्याही गोष्ट मनापासून करायची असेल तर त्याला वयाची मर्यादा येत नाही. या सरदारजी जोडप्याला पाहून त्यांच्या वयाचा विसर पडतो. ते जेव्हा डान्स करतात ना, तेव्हा त्यांचं नातं, प्रेम, त्याच्यांतील बॉण्डिंग प्रत्येक स्टेपमध्ये झळकतं. ते असेच डान्स करत राहो आणि आपण या डान्सचा आनंद घेत राहू.