स्कूल चले हम! मुलीसोबत बकरीही निघाली शाळेत, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनंतर शाळा सुरू झाल्या आता बकरीलाही शाळेत जायचा मोह आवरेना! पाहा व्हिडीओ

Updated: Sep 22, 2021, 07:15 PM IST
स्कूल चले हम! मुलीसोबत बकरीही निघाली शाळेत, पाहा व्हिडीओ

मुंबई: कोरोनामुळे इतके दिवस शाळा बंद होत्या. मात्र काही भागांमध्ये हळूहळू आता शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलंही शाळेत मुलांनी जायला सुरुवात केली आहे. आता घरात पाळीव प्राणी असतील तर सहाजिकच त्यांचा लळा लागणार. आपल्या मागे मागे येणार असे प्रकार होत असतात. एका मुलीच्या मागे चक्क बकरी गेली आहे.

ही मुलगी शाळेत जायला निघाली. तिने या बकरीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र बकरी काही ऐकायला तयार नाही. या मुलीच्या मागे पळत शाळेपर्यंत पोहोचली आहे. या दोघांमध्ये किती प्रेम किती लळा असेल ते या व्हिडीओमधून लक्षात येईल. हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कोरोना कमी होताच शाळा उघडल्या. 

मुलीला शाळेत जात असल्याचं पाहून या बकरीलाही मोह आवरला नाही. ती धावत या मुलीच्या मागे शाळेत जायला निघाली. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशमधील असल्याचं सांगितलं जात आहे. 

हा व्हिडीओ 21 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अडीच हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या बकरीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. लोकांनी या क्युट व्हिडीओला खूप लाईक केलं आहे.