किक मारून चालू होणारी जीप पाहिलीये का? उद्योजक आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती किक मारून जीप सुरू करताना दिसत आहे.

Updated: Dec 22, 2021, 02:15 PM IST
किक मारून चालू होणारी जीप पाहिलीये का? उद्योजक आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक title=

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दररोज काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. ते प्रेरणादायी किंवा मजेदार असतात. आपल्या पेजवर फॉलोअर्सचे व्हिडिओ शेअर करायला ते विसरत नाही. आपल्या चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन करण्यासाठी ओळखले जाणारे आनंद महिंद्रा यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती किक मारून जीप सुरू करताना दिसत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

तुम्ही बाइकला किक स्टार्ट करताना पाहिलं असेल, पण जीप किक स्टार्ट करतानाचा हा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

हे शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की 'ही कार खरे तर नियमांशी जुळत नाही, परंतु मी आमच्या लोकांच्या साध्या स्वभावाचे आणि 'किमान' क्षमतेचे कौतुक करणे कधीही थांबवणार नाही. त्यांचा नाविन्यशिलतेची त्याची आवड आश्चर्यकारक आहे.

ट्विटरवर पोस्ट

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनीही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया दिली आहे. आनंद महिंद्रा किती बिझनेस माइंडेड आहेत हे या कॅप्शनकडे बघून समजू शकते. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला.

आतापर्यंत 1.69 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओला 10 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर 1000 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेक मुद्द्यांवर ते आपले मतही मांडतात.