खोटं खोटं म्हणत भावानं बहिणीला खरंच बदडलं, अखेर या लग्नात असं काय घडलं? पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट होते की, लग्नाचे मुख्य विधी झाले आहेत, परंतु लग्नानंतरचा एक विधी येथे पार पाडला जात आहे.

Updated: Jul 31, 2021, 06:04 PM IST
खोटं खोटं म्हणत भावानं बहिणीला खरंच बदडलं, अखेर या लग्नात असं काय घडलं? पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : भारतात बऱ्याच जातीचे आणि प्रांताचे लोकं राहातात. ज्यामुळे भारतात आपल्याला अनेक प्रकारच्या परंपरा आणि विधी पाहायला मिळतात. काही विधी आपल्याला माहित असतात तर काही विधी या आपल्यासाठी नवीन असतात, ज्याची आपल्याला कल्पना नसते. भारतात बरेच लोकं मोठ्या थाटामाटात लग्न आणि त्यांच्या चालीरिती पार पडतात.

आपण अशा वेगवेगळ्या चालीरितींना सोशल मीडियावरील व्हिडीओमार्फत पाहातो, ज्यामुळे आपल्या असे ही काही आपल्या देशात घडते का? असे देखील प्रश्न पडतात. त्यात काही विधी आणि परंपरा या खरोखर लोकांना आश्चर्य करणारे असतात.

राजस्थान-हरियाणाच्या काही भागात लग्नाच्या निमित्ताने वधू बनलेल्या बहिणी आणि भावामध्ये भांडणाची परंपरा आहे. या विधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर Rajnesh_meene_083 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या लग्नाच्या व्हिडीओमध्ये नववधू आणि पाहूने दिसत आहेत. त्यांच्या कपड्यांना पाहाता हे लग्न हरियाणा किंवा राजस्थान भागातील असल्याचे समोर आले आहे.

या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट होते की, लग्नाचे मुख्य विधी झाले आहेत, परंतु लग्नानंतरचा एक विधी येथे पार पाडला जात आहे. यामध्ये विधीप्रमाणे वधू आणि तिच्या भावामध्ये भांडण सुरू आहे, ज्यामध्ये ते एकमेकांना काठीने मारत आहेत. परंतु थोड्यावेळाने नववधूच्या भावाला अचानक काय होते हे कोणालाच कळत नाही, परंतु तो नंतर रागाने जोरजोरात नववधूला मारु लागतो, तेव्हा त्याला पकडायला आजूबाजूचे लोकं धावून येतात परंतु तो काही ऐकाला तयार नसतो, तेव्हा मग नवरदेवाला त्यात पडावे लागलं. नवरदेव मग नवरीच्या भावाला नवरीपासून लांब घेऊन जातो आणि त्याला 2 कानाखाली मारतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओला 4 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे, लोकांना हा व्हिडीओपाहून प्रश्न पडला आहे की, असं काय झालं असावं की, नवरीचा भाऊ इतका का रागवला असावा? परंतु याचे उत्तर आता कोणालाच माहित नाही तुम्हाला जर काही कल्पना असेल तर कमेंट करुन नक्की कळवा.